मधात मिक्स करुन रोज खा 'ही' गोष्ट! 15 दिवसात व्हाल चष्म्याच्या टेन्शनपासून मुक्त

Eyesight Health Issues Home Remedies: तुमची नजर क्षीण झाली आहे आणि तुम्ही तुमची दृष्टी सुधारण्यासाठी काय करता येईल याचा विचार करत असाल तर या प्रश्नाचं उत्तर तुमच्या जेवणामध्ये दडलं आहे. नैसर्गिरित्या नजर अधिक स्पष्ट करण्यासाठी काय करता येईल पाहूयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 9, 2023, 01:39 PM IST
मधात मिक्स करुन रोज खा 'ही' गोष्ट! 15 दिवसात व्हाल चष्म्याच्या टेन्शनपासून मुक्त title=
डोळ्यासंदर्भातील समस्यांवर रामबाण उपाय (प्रातिनिधिक फोटो)

Eyesight Health Issues Home Remedies: हल्लीच्या स्मार्ट युगामध्ये लोकांच्या लाईफस्टाइलमध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. सध्याच्या काळात लोकांचा बराचसा वेळ हा मोबाईल, कंप्युटर, टीव्ही किंवा लॅपटॉपची स्क्रीन पाहण्यात जातो. जास्त प्रमाणामध्ये डिजीटल स्क्रीनसमोर राहिल्याने डोळ्यांना थकवा जाणवतो. अनेक डॉक्टर डोळ्यासंदर्भातील रुग्ण तपासणीसाठी येतात तेव्हा त्यांच्यामध्ये डिजीटल गॅजेट्सच्या वापरामुळे उद्भवणाऱ्या समस्या दिसून येत असल्याचं सांगतात. गॅजेट्सच्या अती वापरामुळे अनेकांना अंधुक दिसणं, डोळ्यातून पाणी येतं किंवा नजरेसंदर्भातील समस्या जाणवतात. सध्याच्या युगात गॅजेट्सचा वापर पूर्णपणे बंद करणे किंवा टाळणे शक्य नाही. त्यामुळेच डोळ्यांसंदर्भातील समस्या निर्माण होऊ नयेत किंवा झाल्या तरी त्यावर कसा उपाय करावा असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. या प्रश्नाचं उत्तर घरातच दडलंय...

या सवयी बदलाव्या लागतील

हल्ली अगदी लहान वयातच मुलांना चष्मा लागतो. केवळ मोबाईल आणि टीव्ही समोर अनेक तास बसल्याने नजर कमकुवत होते असं नाही. आहारासंदर्भातील बेजबाबदारपणाही डोळ्यांची नजर कमकुवत करण्यासाठी कारणीभूत असतो. तुम्हालाही नजरेसंदर्भातील समस्या जाणवत असतील आणि नैसर्गिक मार्गावर यावर मात करायची असेल तर जेवणाच्या सवयींमध्ये बदल करावा लागेल. नैसर्गिकपणे नजर सक्षम ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या घटकांचा आहारामध्ये समावेश करुन घेतला पाहिजे.

ही गोष्ट दिवसातून एकदा तरी खा

तुम्ही अश्वगंधाबद्दल नक्कीच ऐकलं असेल. अश्वगंधा आणि मध एकत्र करुन खाल्ल्यास डोळ्यांच्या आरोग्यासाठी ते फार लाभदायक असतं. नजर सक्षम करण्यासाठी अश्वगंधा आणि मधाचं चाटण करुन खाणं फायद्याचं ठरतं. अश्वगंधामध्ये अढळणारे गुणधर्म नजरेचा धुरसटपणा दूर करण्यासाठी फायद्याचे असतात. डोळ्यांना जाणवणारा थकवा कमी करण्यासाठीही अश्वगंधा आणि मधाच्या मिश्रणाचा फायदा होतो. तुम्हाला तुमची नजर नैसर्गिक पद्धतीने अधिक सक्षम करायची असेल तर रोज अश्वगंधा आणि मधाचं चाटण दिवसातून एकदा तरी खा.

कसा होणार फायदा?

अश्वगंधा आणि मधामध्ये ॲण्टी ऑक्सिडंटसारखं काम करतं. यामुळे रोगप्रतिकारशक्तीला चालना मिळते. अश्वगंधा हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फार उपयुक्त ठरते. याचं सेवन कसं करावं असा प्रश्न पडला असेल तर 5 ग्राम अश्वगंधा घ्या आणि ते मधामध्ये टाकून एकत्रित करुन घ्या. अवघ्या 15 दिवसांमध्ये तुम्हाला नजरेसंदर्भातील सकारात्मक बदल जाणवू लागेल.

(Disclaimer - वरील माहिती सर्वसामान्य माहिती आणि संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)