मुंबई : डोळे हा आपल्या शरीराचा अतिशय नाजूक भाग आहे. डोळ्यांना झालेली छोटीशी जखमही तुमच्यासाठी गंभीर असू शकते. म्हणूनच आपण आपल्या डोळ्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्याच वेळी, आजकाल लोक फॅशन किंवा दृष्टीच्या अभावामुळे कॉन्टॅक्ट लेन्स घालतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, यामुळे तुम्हाला गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. होय, कॉन्टॅक्ट लेस काढण्यात किंवा लावण्यात थोडासा निष्काळजीपणा देखील तुमच्या डोळ्यांना हानी पोहोचवू शकतो. याशिवाय कॉन्टॅक्ट लेन्स जास्त वेळ घातल्याने डोळ्यांना गंभीर नुकसान होऊ शकते.
अनेक लोक सकाळपासून ते रात्रीपर्यंत अनेक वेळा डोळ्यांमध्ये कॉन्टॅक्ट लेन्स लावतात, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांना गंभीर समस्या निर्माण होतात. कॉन्टॅक्ट लेन्स घालण्याचे काय तोटे आहेत हे आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत.
जर तुम्ही जास्त वेळ कॉन्टॅक्ट लेन्स घातल्या तर त्यामुळे तुमच्या डोळ्यांना जळजळ होऊन डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो. याशिवाय अंधुक दृष्टी आणि कॉर्नियाशी संबंधित समस्या अशा अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.
जर तुमच्या डोळ्यांमध्ये कॉन्टॅक्ट लेन्स लावल्यानंतर लालसरपणाची समस्या येत असेल, तर तुम्हाला हे समजले पाहिजे की, ते तुमच्या डोळ्यांना इजा करत आहे. दुसरीकडे, ही समस्या काही दिवसांत संपत नसेल, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.
जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स जास्त वेळ चालू ठेवल्या, तर ते तुम्हाला कॉर्नियल अल्सरची समस्या उद्भवू शकते. म्हणजेच काय तर डोळ्यात अल्सर होणे. हे खूप वेदनादायक असू शकतात, ज्यामुळे डोळे उघडण्यात आणि बंद करण्यात अडचण येऊ शकते.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)