मुंबई : जवसाचे औषधी गुणधर्म आश्चर्य वाटावे असे आहेत.
त्याचे गुणधर्म परदेशात संशोधन झाल्याशिवाय आपल्याला समजत नाहीत पण आता अमेरिकेतल्या काही संशोधकांनी जवसामध्ये ओमेगा – ३ या नावाचे अँटी अॅसिड असते असे दाखवून दिले. हे अॅसिड डॉक्टरांच्या भाषेत सांगायचे झाले तर गुड ड्रग आहे. त्याशिवाय लिग्नन नावाचा घटक जवसात आहे आणि त्याच्यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ते अनेक रोगांना प्रतिबंध करणारे आहे. कर्करोगापासून सुटका करणारे फायबर जवसामध्ये विपुल असते. त्यामुळे जवसाला अनेक रोगांचा प्रतिबंध करणारे औषध मानले जायला लागले आहे.
जवसमध्ये प्रोटीन्स २०.३ ग्रॅम, फॅट्स ३७.१ ग्रॅम, मिनरल्स २.४ ग्रॅम, फायबर ४.८ ग्रॅम, कार्बोहायड्रेट्स २८.९ ग्रॅम, कॅल्शियम १७० मिली ग्रॅम, फॉस्फोरस ८७० मिली ग्रॅम, आयर्न २.७ ग्रॅम.
टाईप – टू डायबेटीस असणाऱ्या रुग्णांमध्ये जवसातील लिग्नन उपयुक्त ठरते. कारण हे लिग्नन ब्लड शुगरचा समतोल साधते. हृदयरुग्णांसाठीसुद्धा जवसातील काही गुणधर्म उपयोगी पडतात. जवस कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते. कर्करोग आणि अन्यही काही विकारांवर जवस उपयुक्त ठरते. जवसाची पूड चमचाभर घेऊन ती पाण्यात मिसळून सकाळी सकाळी प्राशन केली तर हे सारे गुणधर्म आपल्याला उपयुक्त ठरतात. स्वयंपाक करताना खाद्यपदार्थांवर वरून जवसाची चमचाभर पूड पसरवली तरीही जवस आपल्या शरीरात जाऊन योग्य ती कामगिरी बजावतो. असे असले तरी अती तिथे माती हा नियम जवसालाही लागू आहे. जवसाचे खाण्याचे प्रमाण राखले गेले पाहिजे आणि ते मर्यादेतच ठेवले पाहिजे त्याचे अधिक प्राशन आरोग्याला घातक ठरू शकते.
यामध्ये प्रोटीन अधिक असते ज्यामुळे बोन्स मजबूत होतात आणि जॉइंटपेन टाळता येते
यामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स असतात. जे दम्यापासून बचाव करण्यास मदत करते
जवसामधील अँटीऑक्सींडेंट्स बॉडीला डिटॉक्स करतात ज्यामुळे लिव्हर प्रॉब्लेम दूर होते
यामध्ये फायट्रोएस्ट्रोजंस असतात. जे पिरियड्स प्रॉब्लम कमी करण्यात फायदेशीर असते
जवस खाल्याने ब्लड शुगर लेव्हल नॉर्मल राहते. ज्यामुळे डायबिटीज नियंत्रित राहते
यामध्ये आयरन असते जे एनीमिया दूर करण्यात फायदेशीर असते
जवस खाल्ल्याने बॉडी हायड्रेट राहते आणि स्किनचा ग्लो टिकून राहतो
हे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते आणि हार्ट प्रॉब्लेम टाळता येतो.