Sprouted Potatoes : मोड आलेल्या बटाट्यांचा वापर आपण करतो. कदाचित तुमच्या घरातंही मोड आलेले बटाटे असतील. बटाटे (Potato) अधिक दिवस ठेवले की त्याला मोड आलेलं तुम्ही पाहिलं असेल. मोड आलेले बटाटे (Sprouted Potato) खाण्यावरून अनेक चर्चा होतात.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मोड आलेल्या बटाट्यांचं सेवन केल्याने आरोग्यासंबंधी (Health) त्रास होऊ शकतात. अशावेळी अनेकजण आलेले मोड काढून टाकून बटाट्यांचा वापर करतात. मात्र मोड आलेले बटाटे खावेत की खाऊ नयेत. जर तुमच्या मनातंही हा प्रश्न असेल तर हे आर्टिकल नक्की वाचा.
मोड आलेले बटाटे हे आरोग्यासाठी चांगले नसतात. मोडं येणं भाजीपाल्यावर एका रासायनिक प्रक्रिया होते. अशा बटाट्यांचं सेवन करणं आरोग्यासाठी घातक ठरण्याची शक्यता असते.
बटाट्याला जिथे खड्डे असतात तिथून मोड येतात. मोड आल्यावर बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट 'स्टार्च'चं साखरेत रूपांतर होतं. परिणामी बटाटा खूप मऊ होतो. यामुळे सोलानाईन तसंच अल्फा-कॅकोनाइन नावाच्या दोन अल्कलॉइड्सची निर्मिती होते. सॅलोनिन आपल्या शरीरासाठी हे विषारी मानलं जातं.
अनेकदा तुम्ही बटाट्यांना आलेला हिरवा रंग पाहिला असेल. मात्र अशा हलक्या हिरव्या रंगाच्या बटाट्यांचंही सेवन करू नये. बटाट्याचा स्वयंपाकासाठी वापर करताना हिरव्या रंगाचा भाग काढून टाकावा. असे बटाटे खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते.
एका अभ्यासानुसार, जेव्हा बटाटे मुळापासून काढले जातात त्या काळात सर्वाधिक पोषक घटक असतात. परंतु बटाटा बराच काळ ठेवला असेल आणि त्याला मोड आले असतील तर ते फेकून देणं योग्य ठरेल.
नॅशनल कॅपिटल पॉयझन सेंटरच्या रिपोर्टनुसार, मोड आलेल बटाटे फेकून देणं योग्य असतं. कारण असे बटाटे आरोग्यासाठी चांगले नाहीत. अंकुरलेले बटाटे विषारी असण्याची दाट शक्यता आहे. बटाट्यामध्ये नैसर्गिकरित्या विषारी घटक असतात जसं की, सोलानाईन आणि चाकोनाइन. मात्र ते फार कमी प्रमाणात आढळतात.
जर बटाट्याला मोड आले तर त्यामध्ये विषारी घटकांचं प्रमाण वाढू लागतं. त्यामुळे असे बटाटे खाल्ल्यास शरीराला हानी पोहोचू शकते, असंही अहवालात म्हटलंय.