उपाशी पोटी अंडी खाल्यास 'हे' होतील फायदे... जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला रिकाम्या पोटी अंडी खाण्याचे काय फायदे आहेत ते सांगणार आहोत. 

Updated: Oct 16, 2022, 05:03 PM IST
उपाशी पोटी अंडी खाल्यास 'हे' होतील फायदे... जाणून घ्या  title=
Eating eggs on an empty stomach will have these benefits nz

Egg : अनेकदा तुम्ही लोकांना रिकाम्या पोटी अंडी खाताना पाहिले असेल. आम्‍ही तुम्‍हाला सांगतो की अंड्यांमध्‍ये असे अनेक पोषक घटक असतात जे आरोग्याला अनेक समस्यांपासून दूर ठेवू शकतात. अशा स्थितीत, लोकांसाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की रिकाम्या पोटी अंडी खाल्ल्याने आरोग्याला फायदा किंवा हानी होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला रिकाम्या पोटी अंडी खाण्याचे काय फायदे आहेत ते सांगणार आहोत. (Eating eggs on an empty stomach will have these benefits nz)

आणखी वाचा - Glowing Skin हवीये तर तुमच्या आहारात या गोष्टी असल्यात पाहिजेत...जाणून घ्या

 

अंड रिकाम्या पोटी खाण्याचे फायदे -

1. रिकाम्या पोटी अंडी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच पण त्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक समस्यांपासून दूर ठेवता येते.

2. जर तुम्हाला दिवसभर सक्रिय राहायचे असेल आणि शरीर चपळ बनवायचे असेल तर तुम्ही अंडी खाणे हे सगळ्यात महत्त्वाचा उपाय ठरु शकतो.

3. कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी अंड्याचाही तुम्हाला खूप उपयोग होऊ शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो की अंड्यांमध्ये फॉस्फेटाइड्स आणि ओमेगा -3 असतात. अशा परिस्थितीत याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवता येते.

आणखी वाचा - 'हे' बॉलिवूड स्टार्स अभिनयाशिवाय 'या' कामातून करतात कोटींची कमाई

 

4. जर उकडलेले अंडे रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ले तर डोळ्यांच्या संबंधातील समस्यापासून सुटका होते. अंड्यामध्ये झेक्सॅन्थिन आणि ल्युटीन नावाचे घटक असतात जे डोळ्यांच्या समस्या दूर ठेवतात.

वर नमूद केलेल्या मुद्द्यांवरून दिसून येते की रिकाम्या पोटी अंडी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. पण त्याचा अतिरेक आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. अशा परिस्थितीत अंड्यांचे योग्य प्रमाण जाणून घेण्यासाठी एकदा तज्ञाची मदत घ्या.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)