३० दिवस दररोज खा एक केळे, होतील अनेक फायदे

तुम्ही अनेक ठिकाणी वाचले किंवा ऐकले असेल की दिवसाला एक सफरचंद तुम्हाला डॉक्टरांपासून दूर ठेवते.

Updated: Oct 30, 2018, 07:00 PM IST
३० दिवस दररोज खा एक केळे, होतील अनेक फायदे title=

मुंबई : तुम्ही अनेक ठिकाणी वाचले किंवा ऐकले असेल की दिवसाला एक सफरचंद तुम्हाला डॉक्टरांपासून दूर ठेवते.  याचा अर्थ दररोज एक सफरचंद खाल्ल्याने तुम्हाला कधीच डॉक्टरांकडे जावे लागणार नाही. मात्र तुम्हाला माहीत आहे का दररोज एक केळे खाल्ल्याने तुमचे शरीरस्वास्थ चांगले राहू शकते. केळ्याच्या रोजच्या दिनचर्येत सामाविष्ट केल्यास तुम्ही स्वस्थ राहू शकता. 

अशक्तपणा होईल दूर - केळी खाल्ल्याने इन्स्टंट एनर्जी मिळते. दररोज केळी खाल्ल्यास अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.

पचनशक्ती सुधारेल - केळ्यात मोठ्या प्रमाणात फायबर असतात. केळी खाल्ल्याने पाचनशक्ती सुधारते. तसेच बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीचा त्रास होत नाही. 

हृदयाचे आरोग्य चांगले राहील - केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटामिन सी आणि बी६ असतात. दररोज केळे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कंट्रोल होते.

स्मरणशक्ती सुधारते - केळ्यामध्ये व्हिटामिन बी६चे पुरेशा प्रमाणात आढळते. ज्यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत चालते. तसेच स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. 

ब्लडप्रेशर कंट्रोल होण्यास मदत होते - केळ्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असतात. हे खाल्ल्याने शरीरात सोडियमचे प्रमाण संतुलित राहते ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राखण्यास मदत होते. 

युरिनरी इन्फेक्शनपासून बचाव होतो - केळ्यामधील मॅग्नेशियम आणि पोटॅशियममुळे युरिनरी इन्फेक्शनपासून बचाव होतो.