पोटाची चरबी कमी करतो 'हा' पदार्थ !

वजन कमी करणाऱ्यांना याचा खूप फायदा होतो. 

Updated: Jun 24, 2018, 01:06 PM IST
पोटाची चरबी कमी करतो 'हा' पदार्थ !  title=

मुंबई : आजारी माणसाला गव्हाच्या रव्याचा आहार दिल्यास गुण येत असल्याच आपण ऐकलं असेल. गहू दळून हे बनवलं जात. यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात. वजन कमी करणाऱ्यांना याचा खूप फायदा होतो. 

गव्हाचा रवा खाण्याचे फायदे 

१) गव्हाच्या रव्यात मोठ्या प्रमाणात फायबर असतात. जे कॉलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यास मदत करतात. यामुळे खाण्याच्या बराच वेळ नंतरही पोट भरलेले वाटते. यामुळे सारख सारख खाण्याची गरज भासत नाही. 

२) शरीराला उर्जा देण्यासाठी गव्हाच्या रव्यासारखं दुसर काही नाही. याच्या सेवनाने मेटाबॉलिज्म सिस्टम चांगली होते. याच्या छोट्या छोट्या कणात भरपूर एनर्जी असते. यामुळे परफेक्ट नाश्तादेखील होतो. 

३) गव्हाच्या रव्यात अॅण्टी-ऑक्साइड मुबलक प्रमाणात आढळते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यास यामुळे मदत होते.

४) दुसऱ्या कोणत्याही नाश्त्याशिवाय खूप कमी कॅलरी असते. यामुळे शरीराला उर्जा मिळते. एवढच नव्हे तर यामुळे वजन वाढत नाही. उलट याच्या नियमित सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते.