मुंबई : मुली त्यांच्या फीटनेसची जितकी काळजी घेतात त्यापेक्षा थोडी जास्त किंबहुना थोडी अधिकच त्यांच्या त्वचेची काळजी घेतात. त्वचेवर पिंपल्स, टॅनिंग कमी, निस्तेजपणा कमी करण्यासाठी मुली सतत प्रयत्न करतात. ब्युटी पार्लरप्रमाणेच काही घरगुती उपायांच्या मदतीनेदेखील त्वचेचं सौंदर्य खुलवता येतं. त्वचेवरील समस्या कमी करण्यासाठी मुलतानी माती फायदेशीर ठरते. मग मुलतानी मातीमध्ये नेमके काय मिसळल्यास ते अधिक फायदेशीर ठरतात हे तुम्हांला ठाऊक आहे का?
फेसपॅक ठरतात फायदेशीर
मुलतानी मातीमध्ये बेसन आणि चंदनाची पावडर मिसळणं फायदेशीर ठरतं. हे तिन्ही पदार्थ चमचाभर घेऊन एकत्र करून मिश्रण बनवा. यामध्ये गुलाबपाणी मिसळून पेस्ट बनवा. हा फेसपॅक चेहर्यावर लावून नैसर्गिक रित्या सुकू द्यावा.
हा फेसपॅक लावण्यापूर्वीदेखील त्वचेवर गुलाबपाणी कापसाच्या बोळ्याने लावा.
फेसपॅक सुकल्यानंतर चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवावा.
आठवड्यातून हा फेसपॅक दोनदा चेहर्यावर लावणं फायदेशीर आहे.
नियमित या फेसपॅकचा वापर केल्याने त्वचा सतेज आणि मुलायम होण्यास मदत होते.