मुंबई : पालकामध्ये शारिरीक विकासाठी लागणारी सर्व पोषक तत्वे असतात. मिनरल्स, व्हिटामिन आणि अनेक पोषकतत्वांनी भरपूर असलेला पालक सुपर फूड आहे. पालकमध्ये व्हिटामिन ए,सी,ई, के आणि बी कॉम्पेलक्स मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय मँगनीज, कॅरोटीन, आर्यन, आयोडिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम,सोडियम, फॉस्फरस आणि आवश्यक अमिनो अॅसिड असते. पालकांची भाजी अथवा पराठे बनवले जातात. मात्र पालकाचे संपूर्ण फायदे मिळवायचे असल्यास त्याचा जूस प्यावा.
पालकामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. याच्या सेवनाने चेहऱ्यावर ग्लो येतो.
पालकामध्ये व्हिटामिनचे प्रमाण अधिक असते. पालकाचा रस प्यायल्याने हाडे मजबूत होतात.
पाचनक्रिया सुरळीत राखण्यासाठी पालकाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम पालकाचा रस करते. तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर पालकाचा रस प्यायल्याने फायदा होतो.
त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास पालकाचा रस प्यावा. पालकाचा रस प्यायल्याने त्वचा उजळते. केसांसाठी पालकाचे सेवन चांगले.
गर्भवती महिलांनाही पालकाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. पालकाचा रस प्यायल्याने गर्भवती महिलांच्या शरीरातील लोहाची कमतरता दूर होते.
पालकामध्ये असलेले कॅरोटीन आणि क्लोरोफिल कॅन्सरपासून लढण्यास मदत करतात. याशिवाय पालकाचा रस प्यायल्याने डोळ्यांचे आरोग्यही सुधारते.
पालकाचा रस बनवण्यासाठी पालक आणि पुदिन्याची पाने धुवून मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यानंतर यात पाणी, भाजलेले जिरे, काळे मीठ आणि लिंबू मिसळून प्या.