लंडन : काय तुम्हाला आयुष्य वाढवायचं आहे? तर लगेच तुमचा कप कॉफीने भरा. एका अभ्यासानुसार, कॅफिनच्या वापराने क्रोनिक किडनीचा आजार झालेल्या रूग्णांचं आयुष्य वाढतं.
या अभ्यासाच्या निष्कर्षांमध्ये सांगितलं की, जे लोक सर्वात जास्त कॉफी पितात, त्यांची मरण्याची शक्यता २४ टक्के कमी होते. तर कमी कॉफी पिणा-यांची मरण्याची शक्यता १२ टक्क्याने कमी असते.
पोर्टुगलच्या सेंट्रो हॉस्पीटलर लिस्बोआ नोर्टेचे मिगुअल बिगोट्टे विईराने म्हणाले की, ‘या अभ्यासातून उघड होतं की, सीकेडीच्या रूग्णांनी जास्त कॉफी केल्यास त्यांचं आयुष्य वाढू शकतं. हा एक सोपा क्लिनिकली प्रमाणित आणि स्वस्त पर्याय असू शकतो’.
रिसर्च टीमने सीकेडी पीडित २३२८ रूग्णांचा अभ्यास करून निष्कर्ष काढला. विईरा जोर देऊन म्हणाले की, यासोबतच हा अभ्यास कॉफीमुळे सीकेडी रूग्णांचं मरण टाळता येतं हे अजिबात सांगत नाही. पण हा एक सुरक्षात्मक पर्याय असू शकतो. अमेरिकेतील एका केमिकल सोसायटीच्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, कॉफी पिल्याने मधुमेहाची शक्यता कमी होते.