weight Loss Tips : थंडीच्या दिवसात प्या ‘हे’ सूप, चरबी मेणासारखी वितळेल

वजन कमी करण्यासाठी काही महागड्या आणि अनोख्या गोष्टीच खायला हव्यात असे अजिबात नाही. दररोज खाल्ले जाणारे काही पारंपारिक भारतीय पदार्थ देखील जलद गतीने वजन कमी करू शकतात. फक्त कशासोबत काय खावे (combination of foods for weight loss) हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. 

Updated: Dec 5, 2022, 03:59 PM IST
weight Loss Tips : थंडीच्या दिवसात प्या ‘हे’ सूप, चरबी मेणासारखी वितळेल     title=
drink this soup in cold days your fat will melt

Weight Loss Tips : वाढत्या वजनामुळे अनेकजण हैराण असतात. अनेक गोळ्या, औषधे आणि व्यायाम केला तरी काहींचे वजन कमी होत नाही. परंतु, तुम्ही आता घरच्या घरी कोणत्याही गोळ्या, औषधे किंवा व्यायाम न करता झपाट्याने वजन कमी करू शकता. कसं ते जाणून घ्या..वजन कमी करण्यासाठी दररोज सूप प्यावे लागेल. त्याशिवाय सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत आणि या दिवसात हे सूप सेवन केले तरी वजन कमी कारण्यासोबत आरोग्याला अनेक फायदे होतात.

थंडीच्या दिवसात वजन कमी करणारे सूप

1. मशरूम सूप : मशरूम हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. म्हणून थंडीच्या दिवसात मशरूम मोठ्या प्रमाणात खातात. ज्या प्रकारे मशरूमची भाजी जितकी स्वादिष्ट असते तितकेच मशरूमचे सूप जास्त स्वादिष्ट असते. विशेष म्हणजे हे सूप वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. मशरूममध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळते. इतरही बरेच पोषक घटक असल्यामुळे वजन झपाट्याने कमी होते.

2. भाज्यांचे सूप: वजन कमी करण्यासाठी भाज्यांचे सूप खूप फायदेशीर ठरते. कारण सर्व भाज्यांमध्ये अनेक पोषक तत्वे असतात, भाज्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाणही खूप कमी असते. थंडीच्या दिवसात वेगवेगळ्या आरोग्यदायी भाज्यांचे सूप तयार करून प्यावे, जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

वाचा थंडीच्या हंगामात 'ही' भाजी खायला विसरू नका,  डायबिटीसपासून मिळेल आराम

3. टोमाटोचे सूप : थंडीच्या दिवसात टोमॅटो मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो, त्याशिवाय वजन कमी करण्यासाठी टोमॅटोचे सूप तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. टोमॅटोमध्येही कॅलरीज आणि फॅट खूप कमी प्रमाणात असते, त्याशिवाय बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन सी यासह इतर अनेक पोषक घटक असतात. टोमॅटो सूप चविष्ट असतो.

4. फुलकोबीचे सूप: थंडीच्या दिवसात फुलकोबीची भाजी प्रत्येक स्वयंपाकघरात करतात. त्याशिवाय कोबीचे सूप देखील वजन कमी करण्यास खूप फायदेशीर आहे. अनेक पोषक तत्वे कोबीमध्ये असतात.

5. चिकनचे सूप: चिकनचे सूप वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असते. चिकनमध्ये फॅट असली तरी कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात, त्याशिवाय त्यात कॅलरीज कमी असतात. ज्यामुळे वजन कमी होते.