मुंबई : तुमच्या मनात काय चालालय आणि त्याचं भविष्य काय असेल याचे अनेकदा आपल्याला कळत नकळत संकेत मिळत असतात. त्यापैकी एक पर्याय म्हणजे आपल्याला पडत असलेली स्वप्न. मानसशास्त्रामध्ये तुमच्या स्वप्नांमागील अर्थ ओळखण्यासाठी अभ्यास केला जातो. वाईट स्वप्न पडत असतील तर करा हे ८ सोपे उपाय
जपानच्या ATR Computational Neuroscience Laboratory मध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार आपल्याला स्वप्नात दिसणार्या काही गोष्टींमध्ये आपल्या भविष्याचे काही संकेत दडले आहेत. मग पहा काय आहे त्याचा अर्थ -
तुम्ही उडताना दिसत आहात म्हणजे, तुमच्या ध्येयाकडे जाण्यासाठी तुम्हांला अधिक जोमाने झेपावण्याची गरज आहे.
अनेकदा आपण झोपताना पडत असल्याचा भास होतो. तुम्हांला स्वप्नांत पडताना दिसणं म्हणजे तुम्हांला पुन्हा गमवत असलेल्या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याची गरज असल्याचं स्पष्ट होत आहे.
स्वप्नामध्ये कोणीतरी तुमचा पाठलाग करत असल्याचे दिसत असल्यास हे तुमच्या आयुष्यातील संकटांचं, भीतीचं संकेत आहे. वास्तवामध्ये त्यापासून पळू नका तर त्याचा सामना करा.
विवस्त्र दिसणं म्हणजे तुमच्या मनात कशाबद्दल तरी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
मृत्यू दिसणं म्हणजे तुमचं आयुष्य संपलं असा नाही तर तुमच्या आयुष्यातील एखाद्या गोष्टीचा अंत झाल्याचा हा संकेत आहे. मृत्यूनंतर तुमचं काय होतं, पाहा?
स्वप्नामध्ये आग दिसणं म्हणजे तुमच्या आयुष्यात बदल होण्याचे हे संकेत आहेत.
तुम्ही गरोदर असल्याचं दिसणं किंवा त्यासंबंधी काही गोष्टी स्वप्नात दिसत असतील तर त्याचा अर्थ तुमच्या आयुष्यात मोठा बदल आणि वाढ होणार आहे.
स्वप्नामध्ये पाणी दिसणं हे सकारात्मक चिन्ह आहे. तुमच्या आयुष्यात नितळ किंवा स्वच्छ भावनेबद्दल काही संकेत दिले जात आहेत.
स्वप्नात पैसा दिसणं म्हणजे तुमच्या मनातील सध्यस्थितीत काही गोष्टींबाबत सुस्पष्टता नसणं