'या' फळांना कधीही फ्रिजमध्ये ठेवू नका... असं करुन तुम्ही स्वत:चं नुकसान करताय

तुम्हाला हे माहित आहे का, की काही फळे फ्रीजमध्ये ठेवल्याने ते विषारी ठरू शकतात.

Updated: Apr 11, 2022, 04:00 PM IST
'या' फळांना कधीही फ्रिजमध्ये  ठेवू नका... असं करुन तुम्ही स्वत:चं नुकसान करताय title=

मुंबई : उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. लोकांना उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. ज्यामुळे बरेच लोक आपल्याला थंड ठेवण्यासाठी किंवा चांगले वाटण्यासाठी फ्रिजमधील पाणी पितात किंवा थंड पदार्थ खातात. तसेच उन्हाळ्यात वस्तु लवकर खराब होता. ज्यामुळे जेवण असो किंवा फळ आपण त्याला फ्रिजमध्ये ठेवतो. लोकांचं असं मत असतं की, फ्रिजमध्ये ठेवल्यावर सगळ्या वस्तु चांगल्या राहातात. परंतु तुम्हाला माहितीय का? सगळ्याच वस्तु फ्रिजमध्ये ठेवणं चांगलं नाही. जसे फ्रिजमधील थंड पाणी न पिण्याचा तज्ज्ञ सल्ला देताता. तसेच फ्रिजमधील थंड पदार्थ न खाण्याचा देखील डॉक्टर सल्ला देतात.

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ही सवय असते की, ते फ्रिजमध्ये फळ ठेवतात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का, की काही फळे फ्रीजमध्ये ठेवल्याने ते विषारी ठरू शकतात. विशेषतः अशी फळे ज्यात भरपूर गर असतो. सफरचंद, केळी, आंबा, लिची आणि खरबूज फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे.

जाणून घेऊया ही फळं फ्रीजमध्ये ठेवल्याने काय नुकसान होऊ शकते?

आंबा

उन्हाळ्यात थंड आंबा खायला अनेक लोकांना आवडते, कारण ते मन तृप्त करते, तसेच त्याची चव वाढवते. पण तुम्हाला माहित आहे का की फ्रिजमध्ये जास्त वेळ ठेवलेला आंबा तुमचे नुकसान करू शकतो. आंबा फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील अँटीऑक्सिडंट्स कमी होतात आणि पोषक तत्वेही नष्ट होतात. म्हणूनच फ्रीजमध्ये आंबे कधीही ठेवू नका.

खरबूज किंवा टरबूज

उन्हाळा हा टरबूज आणि खरबूजांचा हंगाम आहे. ही मोठी फळं असतात, ज्यामुळे त्यांना एकाच वेळी खाणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत लोक फ्रिजमध्ये टरबूज आणि खरबूज कापून ठेवतात, परंतु तुम्हाला माहितीय का, तुम्ही खूप मोठी चूक करताय. टरबूज-खरबूज कापून फ्रीजमध्ये ठेवू नका. यामुळे अँटिऑक्सिडंट्स नष्ट होतात.

सफरचंद

बहुतेक घरांमध्ये सफरचंद फ्रीजमध्ये ठेवले जातात. यामुळे सफरचंद लवकर खराब होत नाहीत, परंतु त्यातील पोषक घटक कमी होतात. त्यामुळे सफरचंद फ्रीजमध्ये ठेवू नका. सफरचंद जास्त काळ खराब होऊ नये म्हणून कागदात गुंडाळून तुम्ही ठेवू शकता.

लिची

फ्रीजमध्ये ठेवल्याने लिची लवकर खराब होते. त्यामुळे लिची आतून वितळू लागते. थंड आणि रसाळ लिची उन्हाळ्यात चवदार लागतात, परंतु आपण ते फ्रीजमध्ये ठेवण्याचे टाळले पाहिजे. फ्रीजमध्ये ठेवल्याने लिचीचा वरचा भाग तसाच राहतो, पण आतून तो खराब होऊ लागतो.

केळी

केळी कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. केळी फ्रीजमध्ये ठेवल्यास ती खराब होऊन काळी पडू लागतात. केळीच्या देठातून इथिलीन वायू बाहेर पडतो, त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेली इतर फळे लवकर पिकतात.