Health News: चुकूनही चहासोबत या ५ गोष्टी खाऊ नका

 आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की चहासोबत कोणत्या पदार्थांचं सेवन करू नये. 

Updated: Jun 6, 2021, 08:30 PM IST
Health News: चुकूनही चहासोबत या ५ गोष्टी खाऊ नका title=

मुंबई : चहाची चाहत अनेकांमध्ये दिसून येते. अनेकांना सकाळी उठल्याबरोबर चहाचा कप प्रथम हातात लागतो. तर बऱ्याच जणांना चहासोबत काही ना काही खाणंही आवडतं. तुम्हाला देखील चहासोबत काही पदार्थ खाण्याची आवड असेल. मात्र तुम्ही चहासोबत जे खाताय त्यामुळे आरोग्याला नुकसान तर होत नाहीये ना? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की चहासोबत कोणत्या पदार्थांचं सेवन करू नये. 

बेसनाचे पदार्थ

बेसनचा लाडू किंवा बेसनचे काही पदार्थ आपण चहासोबत खाणं पसंत करतो. मात्र ही हेल्दी सवय नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, चहासोबत बेसनाचे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील पोषक तत्त्व कमी होतात. शिवाय यामुळे पचनासंर्भातील समस्याही उद्भवतात. 

कच्चे खाद्यपदार्थांचं सेवन टाळावं

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, चहासोबत कच्चे पदार्थ खाणं योग्य नाही. यामुळे पोटाच्या समस्या बळावून आरोग्य बिघडू शकतं. त्यामुळे शक्यतो चहासोबत सॅलड, मोड आलेले कडधान्य, किंवा उकडलेलं अंड खावं.

चहा प्यायल्यावर पाणी पिणं टाळा

चहासोबत किंवा चहा प्यायल्यानंतर थंड पदार्थांचं सेवन करणं टाळावं. त्याचप्रमाणे चहा प्यायल्यानंतर त्वरित पाणी प्यायल्याने पचन क्रियेवर परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे हायपर अॅसिडीटी होऊन पोटाची संबंधित समस्या जडू शकतात. त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर चहा पिण्यापूर्वी पाणी प्यावं.

लिंबाचा वापर नको

अनेकजण चहामध्ये लिंबू पिळून चहा बनवतात. मात्र हा चहा अॅसिडीटी आणि पचन संबंधी तसंच गॅस संबंधी तक्रारी उद्भवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. यासाठी डॉक्टरही चहासोबत लिंबाचे पदार्थ खाणं टाळण्याचा सल्ला देतात. 

हळदीचे पदार्थ खाऊ नयेत

चहासोबत किंवा चहा पिऊन झाल्यानंतर हळद घातलेले खाद्यपदार्ख खाणं टाळावं. चहा आणि हळदीमध्ये उपस्थित रासायनिक घटक एकमेकांशी क्रिया करून पचन कार्याला नुकसान करू शकतात. त्यामुळे हळद असलेल्या पदार्थांचं सेवन टाळावं.

Tags: