थंडीच्या दिवसात केसगळतीचं प्रमाण वाढत का ?

केस गळणे ही नैसर्गिक बाब आहे.

Updated: Nov 25, 2017, 04:50 PM IST
थंडीच्या दिवसात केसगळतीचं प्रमाण वाढत का ? title=

मुंबई : केस गळणे ही नैसर्गिक बाब आहे.

 जुने केस गळून नवीन केस येण्यासाठी जागा मिळते. पण हिवाळ्यात केस डोक्यावर कमी आणि कंगव्यात अधिक दिसतात. हे तुम्हाला ही जाणवले असेल. हे खरंच थंडीमुळे होते का? 

 
 हिवाळ्यात अधिक केस गळतात?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हा गैरसमज अजिबात नाही आहे. हिवाळ्यात खरंच खूप केस गळतात. आपण सस्तन असल्यामुळे थंडीच्या दिवसात आपल्याला या समस्येला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर ऋतुमानातीळ बदल हे देखील केसगळतीचे कारण आहे.

थंडीत टाळूत  काय बदल होतात?

थंडीत टाळू कोरडा होतो. केस कोरडे झाल्यामुळे केसांची मूळ कमकुवत होतात आणि त्यामुळे केस गळतात. थंडीच्या दिवसात फंगल इन्फेकशन वाढते त्यामुळे टाळूच्या ठिकाणी  अनेक समस्या उद्भवतात. केसांत कोंडा होऊन केस गळू लागतात.

ऋतुमानानुसार होणाऱ्या केसगळतीची त्रास पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक होतो का?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या समस्येतून स्त्री आणि पुरुषाशी कोणीही सुटलेलं नाही. केसगळतीची समस्या स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये ही सामान आढळून येते. त्यामुळे दोघांनाही केसगळतीचा अनुभव आला असेल. 

हिवाळयात उद्भवणाऱ्या केसगळतीच्या समस्येला प्रतिबंध कसा करावा?

स्वच्छता हा महत्त्वाचा मुद्दा आहे:  स्काल्फ स्वच्छ ठेवण्यासाठी केस नियमित धुवा. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बाजारात मिळणाऱ्या शाम्पूमध्ये सल्फेटचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्याऐवजी डॉक्टरांनी दिलेला मेडिकेटेड शाम्पू वापरणे योग्य ठरेल. 

तेल लावून घराबाहेर जाऊ नका: जर तुम्ही तेल लावून घराबाहेर पडलात तर तेलकट केसात धूळ. धूर, कचरा चिकटून राहील आणि केस अधिकच खराब होतील.  तेल लावल्यानंतर १०-१५ मिनिटांनी केस धुवा किंवा रात्री झोपण्यापूर्वी तेल लावा.

केस झाकून घ्या: ओढणी किंवा शालने केस झाकून घेतल्यास उन्हापासून किंवा स्काल्फला हानी पोहचवणाऱ्या इतर गोष्टींपासून स्काल्फचे संरक्षण होते.