दिवसातून दोन वेळा ब्रश केला तरी देखील दात पिवळे दिसतात? मग 'हे' असू शकतं त्यामागील कारण

कधीकधी दिवसातून दोनदा दात स्वच्छ करणे पुरेसे नसते. तज्ज्ञांच्या मते दात पिवळे होण्यामागे अनेक कारणं असू शकतात.

Updated: May 10, 2022, 06:08 PM IST
दिवसातून दोन वेळा ब्रश केला तरी देखील दात पिवळे दिसतात? मग 'हे' असू शकतं त्यामागील कारण title=

मुंबई : आपण जरी आपल्या दातांकडे जास्त लक्ष देत नसलो, तरी ते आपल्या शरीराचा एक महत्वाचा भाग आहे. कारण यामुळे आपल्याला जेवण जेवता येतं. आणि दातांनी आपलं काम योग्य प्रकारे केल्यामुळे अन्नामधील प्रथिने आणि चांगले घटक आपल्या पोटात जायला आपल्याला मदत होते. आपण दररोज सकाळ आणि रात्री आपले दात घासतो. परंतु असे असूनही बऱ्याच लोकांचे दात हे पिवळे असतात. असं का?

लोकांना नेहमी असं वाटत असतं की, मी हसल्यानंतर माझे दात पांढरे शुभ्र दिसावेत, परंतु तसे होत नाही, कारण त्यांच्या दातावर एक पिवळा थर असतो. पण असे का? खरंतर याचे कारणही शास्त्रज्ञांनी दिले आहे. चला तर मग जाणून घेऊ या की या मागची नक्की कारणं कोणती आहेत.

कधीकधी दिवसातून दोनदा दात स्वच्छ करणे पुरेसे नसते. तज्ज्ञांच्या मते दात पिवळे होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. पहिले कारण म्हणजे कॉफी, चहा, रेड वाईन किंवा सोडा पेये जास्त पिणे. जर तुम्ही त्यांचा सतत वापर करत असाल, तर तुम्ही दररोज दात स्वच्छ केले, तरी देखील तुमचे दात पिवळे होण्याचा धोका असतो.

अजूनही तुमच्या मनात प्रश्न उपस्थीत असेल, तर चला आपण हे एका उदाहरणाने समजून घेऊ...

सोडामध्ये रसायने असतात जी, दाताचा वरचा थर काढून टाकतात. परिणामी, दातांवर डाग पडतात आणि ते रंगहीन होऊ शकतात. त्यामुळे जर तुमचे दात देखील पिवळे पडत असतील, तर सर्वप्रथम या गोष्टींवर नियंत्रण ठेवा आणि रोज दात स्वच्छ करा. असे केल्याने पिवळेपणा कमी होतो.

तंबाखू चघळणे आणि धुम्रपान हे दात पिवळे पडण्याची मुख्य कारणे आहेत. हे जितके कमी कराल तितके दातांवरील पिवळेपणा कमी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे रोज दात स्वच्छ करणेच आवश्यक नाही, तर अशा गोष्टींपासून अंतर ठेवणेही आवश्यक आहे.

याशिवाय काही औषधांमुळे दात पिवळे पडू शकतात. यामध्ये उच्च रक्तदाब, केमोथेरपी आणि प्रतिजैविक यांसारख्या औषधांचा समावेश आहे.

काही मुलांमध्ये लहानपणापासूनच दात पिवळे दिसतात. याचे एक कारण पोषक तत्वांची कमतरता हे देखील असू शकते. त्यामुळे दातांचा बाहेरील थर योग्य प्रकारे विकसित होत नाही ज्यामुळे दात लहानपणापासूनच पिवळे दिसतात.

याशिवाय वाढते वय हे देखील दात पिवळे होण्याचे कारण असू शकते. दातांच्या अगदी मागे पिवळ्या रंगाचे डेंटिन असते. त्यामुळे वाढत्या वयाबरोबर जेव्हा दाताचा बाहेरचा थर झिजतो तेव्हा पिवळ्या रंगाचे डेंटिन दिसू लागते.