झोपण्याची योग्य पद्धत कोणती, उशी कशाप्रकारे घ्यावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

सकाळी उठल्यावर जर तुम्हाला हातात जडपण किंवा मानेमध्ये लचक जाणवत असेल, तर समजा की, तुम्ही चुकीच्या पद्धतीने झोपत आहाता.

Updated: Apr 23, 2022, 09:06 PM IST
झोपण्याची योग्य पद्धत कोणती, उशी कशाप्रकारे घ्यावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती title=

मुंबई : सकाळी उठल्यावर जर तुम्हाला हातात जडपण किंवा मानेमध्ये लचक जाणवत असेल, तर समजा की, तुम्ही चुकीच्या पद्धतीने झोपत आहाता. म्हणजेच तुमची झोपण्याची पोझिशन चुकीची आहे. खरंतर झोपताना आपल्या शरीराच्या कोणत्याही एका भागावर किंवा सांध्यावर जास्त दाब पडू नये. जर तुम्हाला कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय किंवा बदलाशिवाय झोप येण्यास त्रास होत असेल, तर तुमच्या झोपण्याच्या स्थितीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

तज्ज्ञ नेहमीच आपल्याला पाठीवर झोपण्याचा सल्ला देतात. अशा प्रकारे, शरीराच्या कोणत्याही भागावर जास्त ताण येत नाही. पण, सतत पाठीवर झोपल्याने शरीराच्या पाठीवर दाब पडतो. अशा स्थितीत आपल्या गुडघ्याखाली उशी ठेवून झोपावे. यामुळे आसनासह रक्ताभिसरणही चांगले होते.

एका कुशीवर झोपणे

डाव्या बाजूला झोपणे ही सर्वोत्तम चांगली मुद्रा मानली जाते. यामुळे घोरण्याच्या समस्येपासूनही आराम मिळू शकतो. पण, सतत एकाच बाजूला झोपणे योग्य नाही. याचा गुडघे आणि कंबरेवर वाईट परिणाम होतो, कारण या आसनात कंबर वाकते आणि गुडघे एकमेकांवर घासतात. ज्यामळे सांधेदुखीही वाढू शकते. बाजूला झोपताना गुडघ्यांमध्ये उशी ठेवून झोपा, यामुळे एका पायाचा दुसऱ्या पायावर दाब कमी येईल.

कडेवर झोपताना खांद्याचा पलंगाला स्पर्श झाला पाहिजे, म्हणजेच बाकीचे शरीर एका रेषेत असावे. गुडघ्याच्या मध्यभागी एक उशी ठेवा. कंबर आणि पलंग यांच्यामध्ये मोठे अंतर असल्यास छोट्या उशांचा आधार घ्यावा.

पोटावर झोपल्यास

पोटावर झोपल्याने आराम मिळतो हे खरे आहे, पण त्यामुळे पोटावर दबाव तर पडतोच, तसेच मानेवर आणि शरीराच्या मागच्या भागावरही त्याचा खोल दाब पडतो. पण, पोटावर झोपल्यावरच आराम मिळत असेल, तर पोटाच्या खालच्या भागात उशी ठेवून झोपणे. त्यामुळे पोटावर ताण पडणार नाही.

अचानक उठू नका

उठताना पहिलं एका कुशी व्हा आणि मगच उठा. ज्यानंतर आता हलके खाली वाकून नंतर उभे राहा. असे केल्याने तुमच्या शरीराला आराम मिळेल.

योग्य उशी वापरा

आपल्या मानेची रचना पूर्णपणे सरळ नसून ती थोडी पुढे झुकलेली असते. झोपताना हे आवर्तन राखणे आवश्यक आहे. खूप जाड किंवा खूप पातळ उशीमुळे मान खराब होऊ शकते. कंबर आणि स्नायूंवर खूप ताण येऊ शकतो.

मान आणि पाठदुखीचा त्रास असेल तर डोक्याखाली उशी ठेवू नका. आवश्यक असल्यास, टॉवेल दुमडा आणि लावा. एकंदरीत, उशी अशी असावी की मानेला थोडासा वक्राकार  मिळेल आणि डोके शरीराच्या इतर भागापासून खूप उंच नसेल किंवा खाली झुकलेले नसेल.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x