Sleep Disorder: 5 तासांपेक्षा कमी झोप घेताय? होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम

Insomnia:  चांगली झोप घेणे कोणाला आवडत नाही. त्यासाठी वेळ काढण्याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो. पण त्यातून आपण 5 तासांपेक्षा कमी झोपू शकलो तर त्याचे घातक परिणामाला सामोरे जावू शकतो. 

Updated: Oct 2, 2022, 11:47 AM IST
Sleep Disorder:  5 तासांपेक्षा कमी झोप घेताय? होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम   title=

Disadvantages of Sleeping Less Than 5 Hours  : आपल्यासाठी झोप किती महत्त्वाची आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आरोग्य तज्ञांनी देखील सांगितले की, निरोगी प्रौढ व्यक्तीने 24 तासांपैकी 8 तास झोपले पाहिजे. यामुळे आपले आरोग्य चांगले राहील. काही लोकांना झोपण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो, पण काहीजणांना काही कारणामुळे पुरेशी झोप मिळत नाही. (disadvantages of sleeping less than 5 hours)

आजच्या धावपळीच्या जीवनात नोकरदार वर्गातील लोकांना किंवा लहान मुल असेल तर त्यांच्या आईला झोपायला पुरेसा वेळ मिळत नाही. 5 तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या लोकांच्या शरीरावर किती वाईट परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया.

5 तासांपेक्षा कमी झोपण्याचे तोटे

1. स्मरणशक्ती कमी होणे (Memory Loss)

जर आपण 5 तासांची झोप देखील पूर्ण करू शकलो नाही तर त्याचा मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो. झोपेच्या वेळी आपला मेंदू कार्य करतो की गोष्टी लक्षात ठेवणे सोपे होते. त्याचविरोध जर आपण कमी झोपलोतर स्मरणशक्ती देखील कमी होते. 

2. मूड स्विंग (Mood Swing)

जर आपल्याला झोप लागली नाही तर मेंदू पूर्णपणे थकतो. ज्यामुळे आपला मूड देखील सामान्य राहू शकत नाही. अशा परिस्थितीत नैराश्य, चिंता, तणाव आणि मूड बदलणे अपरिहार्य आहे. त्यामुळे 8 तासांची झोप घ्या.

3. प्रतिकारशक्ती कमकुवत होईल ( Weak Immunity)

कोरोना संसर्गाच्या काळापासून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची चर्चा आहे जेणेकरून रोग टाळता येतील. दुसरीकडे, जर आपण 5 तासांच्या झोपेतूनही वेळ काढू शकलो नाही तर शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते.

 वाचा : तुमचे Whatsap बंद तर झाले नाही ना? एकदा चेक करून बघा, कारण...

4. मधुमेहाचा धोका  (Diabetes Risk)

मधुमेह हा केवळ भारतातच नाही तर जगभरात एक गंभीर आजार बनला आहे. जर तुम्हाला याला बळी पडायचे नसेल तर 8 तासांची झोप नक्कीच घ्या. अन्यथा, रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते आणि मधुमेहाचा धोका निर्माण होतो.

 

 

(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)