Mouth Ulcer: तोंड आलंय, फोडांमुळं अन्न खातानाही त्रास होतोय? हे' घरगुती उपाय क्षणात देतील आराम

Mouth Ulcers Remedies: तोंडात फोड आल्यास काहीही खाणे-पिणे कठीण होऊन जाते. त्यावर तत्काळ उपाय करण्यासाठी बाहेरची औषध घेण्याची किंवा जेल लावण्याची गरज नाही. तुम्ही घरगुती उपाय करूनही आराम मिळवू शकता. 

Updated: Aug 26, 2024, 03:34 PM IST
Mouth Ulcer: तोंड आलंय, फोडांमुळं अन्न खातानाही त्रास होतोय? हे' घरगुती उपाय क्षणात देतील आराम title=

Mouth Ulcers Home Remedies: तोंडात फोड येणे यामुळे लोक त्रस्त असतात. या आजाराची अनेक कारणे असू शकतात. अॅर्लजी, हॉर्मोन्समधील बदल, पोट साफ न होणे किंवा पोटाचे विकार यामुळे हा त्रास होऊ शकतो. एवढंच नाही तर दात लागून तोंडात ओरखडे पडल्यामुळे किंवा गाल चिरल्या गेल्यामुळेही तोंडात फोड येऊ शकतात. या समस्येवर काही घरगुती उपाय केले जाऊ शकतात.

तोंडामध्ये फोड आल्यामुळे खाण्यापिण्यासाठी खूप त्रास होतो. हे फोड बहुतेक गालांच्या आतल्या बाजूला आढळतात. या फोडाला वैद्यकीय भाषेत कॅन्कर फोड (canker sore) असेही म्हणतात. या फोडांमुळे अनेकदा जगणे कठीण होऊन जाते. ते जरी काही काळापुरतेच येत असतील, तरीही त्याने खूप त्रास होतो. पण तुम्हाला या फोडांसोबत तापही येत असेल तर, बरे होण्यासाठी ३ आठवडेही लागू शकतात. अन्न गिळताना जर तुम्हाला खुप त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. 

तोंडाच्या अल्सरसाठी 6 घरगुती उपाय करा 

बहुतेक वेळा तोंडातले फोड स्वतःच बरे होतात आणि त्यांना उपचारांची आवश्यकताही भासत नाही, पण तरीही आपण वेदनांपासून त्वरीत आराम मिळवण्यासाठी आणि बरे होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा वापर करू शकतो. हे पोटाच्या संबंधीत संसर्गामुळे जास्त प्रमाणात होते. म्हणून पोटदुखी, बद्धकोष्ठता अशा समस्या उद्भवणार नाहीत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पोट साफ राहण्यासाठीही प्रयत्न करायला हवे. यामुळे तोंडात फोड येणार नाहीत.

1. तुळशीची पाने
तुळशीचे रोप प्रत्येक घरात असते. ते सहज कुठेही उपलब्ध होते. आपल्या आरोग्यासाठी तुळस खूप फायदेशीर आहे. अनेक समस्यांचा रामबाण उपाय म्हणून तुळशीकडे बघितले जाते. तुळशीचा वापर करून अनेक आजारांवर उपचार करता येतात. तुळशीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात, त्यामुळे दिवसातून दोनदा तुळशीची पाच पाने खाल्ल्याने तोंडात फोड येत नाहीत.

2. खसखस
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत एक चमचा खसखस    घेतल्याने तोंडाचे फोड बरे होतात आणि लवकर आराम मिळतो.

4. खोबरेल तेल
नारळाच्या तेलानेही तोंडातले फोड बरे होऊ शकतात. खोबरेल तेल पाण्यात घालून प्यायल्यास पोट थंड राहते आणि तोंडातले फोड बरे होतात.

5. ज्येष्ठमध
ज्येष्ठमधात आढळणारे गुणधर्म दाहकता कमी करून तोंडाच्या अल्सरपासून आराम देतात. ज्येष्ठमधाची बारीक पावडर करून त्यात एक चमचा मध घालून तोंडाच्या फोडांवर लावावे. याने खूप फायदा होईल.

6. हळद
हळद हा प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे. हळदीमध्ये जंतुनाशक (अँटीसेप्टिक) गुणधर्म आढळतात. हळद थोड्याशा पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करून तोंडातल्या फोडांवर लावावी. ही पेस्ट 10 मिनिट ठेऊन नंतर पाण्याने स्वच्छ तोंड धुवावे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)