दररोज असं करा दहीचं सेवन, वजन होईल कमी आणि पचनसंस्था ही सुधरेल

Yogurt : वजन कमी करण्यासाठी किंवा पचन चांगलं होण्यासाठी दही ठरते फायदेशीर..

Updated: Oct 28, 2022, 11:25 PM IST
दररोज असं करा दहीचं सेवन, वजन होईल कमी आणि पचनसंस्था ही सुधरेल title=

Weight Loss with curd : दही पचनसंस्थेसाठी खूप चांगले मानले जाते. जेवणासोबत रोज एक वाटी दही खाल्ल्याने अॅसिडिटीची समस्या होत नाही. यासोबतच तुमची त्वचाही चांगली होते. दह्याच्या पोषक तत्वांबद्दल बोलायचे झाले तर दह्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-12, व्हिटॅमिन बी-2, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक आढळतात. जर तुम्हाला दही खायला आवडत नसेल तर तुम्ही दह्यापासून अनेक रेसिपी बनवू शकता किंवा इतर कोणत्याही पदार्थात दही मिसळून खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया तुम्ही कोणत्या प्रकारे दही खाऊ शकता. (Yogurt is very good for the digestion system)

फळांची कोशिंबीर

जर तुम्हाला फळे खायला आवडत असतील तर फळांमध्ये दही आणि मध घालून खा. वजन कमी करण्याच्या दृष्टीनेही ही रेसिपी खूप फायदेशीर ठरते.

फ्रुट कस्टर्ड

फ्रूट कस्टर्ड रेसिपी थोडी वेगळी आहे. ते तयार करण्यासाठी, आपल्या आवडीची फळे कापून घ्या. त्यावर दही मिक्स करा. त्यात तुम्ही ड्राय फ्रूट्सही घालू शकता.

गूळ-तीळ

हिवाळ्यात गूळ खाणे खूप फायदेशीर आहे. गूळ खाणे तुमच्या त्वचेसाठी तर चांगले असतेच पण ते तुमच्या आरोग्यासाठीही चांगले असते. अशा परिस्थितीत तुम्ही गूळ, भाजलेले तीळ आणि ड्रायफ्रुट्स एकत्र करून दहीसोबत खाऊ शकता.

रायता

काकडी, टोमॅटो, कांदा, बुंदी किंवा बटाट्याचा रायता दह्यासोबत बनवून खाऊ शकता. त्यावर तुम्ही पुदिना किंवा कोथिंबीर देखील टाकू शकता. त्यामुळे रायत्याची चव आणखी वाढेल.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x