जिरे आरोग्यासाठी लाभदायक

 जिरे एक मसल्यातील पदार्थ आहे. जेवणाला रुचकर चव आणण्यात जिऱ्याचा वाटा मोठा असतो.

Updated: Apr 17, 2019, 03:56 PM IST
जिरे आरोग्यासाठी लाभदायक title=

मुंबई : जिरे एक मसल्यातील पदार्थ आहे. जेवणाला रुचकर चव आणण्यात जिऱ्याचा वाटा मोठा असतो. जिरे केवळ खाण्यासाठी मर्यादीत नाही तर आपल्याला आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जिऱ्याचा उपयोग औषध म्हणून केला जात आहे. जिऱ्यामध्ये लोह, मॅग्नेशिअम, कॅल्शियम, फायबर, झिंक आदींची जास्त मात्रा असते. मेक्सिको, भारत, नार्थ अमेरिका या देशांत जिऱ्याचा जास्त वापर केला जातो. शरीरातील अनावश्यक चरबी बाहेर काढण्यास जिरे मदत करते. तसेच जिरेपूड खल्ल्यानंतर एक तास काहीही खाऊ नका.

- दह्यात भाजलेल्या जिऱ्याचे चुर्ण घालून खाल्यास डायरियावर आराम मिळतो.

- जिऱ्यात लिंबाचा रस आणि मीठ घाला. त्यामुळे उलटीसारखे वाटणे, मळमळणे यावर आराम मिळेल.

- जिऱ्यात थोडे व्हिनेगर घालून खाल्यास उचकी बंद होते.

- जिऱ्यात गुळ घालून त्याच्या गोळ्या बनवा. त्या मलेरियावर लाभदायी ठरतात. 

- एक चिमुटभर कच्चे जिरे खाल्याने अॅसिडीटीपासून सुटका होते.

- मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी एक छोटा चमचा जिरे दिवसातून दोनदा पाण्यासोबत घ्या. नक्कीच फायदा होईल.