Cracked heel remedies: सध्या हिवाळा बऱ्यापैकी सुरु झाला आहे, थंडीमध्ये सर्वात जास्त नुकसान होतं ते त्वचेचं ! थंड हवामानात आद्रतेचं प्रमाण कमी असतं. अश्यात त्वचा कोरडी पडते काळवंडते आणि एकूणच नुकसान होतं .
थंडीमध्ये चेहऱ्याच्या त्वचेप्रमाणे पायांच्या टाचा सुद्धा खूप खराब होतात टाचेला भेगा पडायला सुरवात होते, कधी कधी भेगा खूप वाढतात खोलवर जातात आणि पायांचं सौंदर्य त्यामुळे खराब तर होतंच शिवाय पायाचं आरोग्यसुद्धा खराब होतं. महिला वर्गांना टाचांच्या भेगांमुळे अतिशय त्रासाला समोर जावं लागतं. चारचौघात पाय दाखवायला लाज वाटते शिवाय भेगाळलेल्या टाचा वेदनादायी असतात.
अनेक जणी खूप उपाय करून पाहतात मात्र त्याचा काडीमात्रसुद्धा फरक पडत नाही, बाजारातून आणलेले महागडे क्रीम्स, जेल सगळं काही वापरलं जात मात्र पैसे वाया जातात,पण टाचांच्या भेगा काही कमी होतं नाही.
म्हणूनच आजच्या सेगमेंट मध्ये आपण जाणून घेणार आहोत अश्या क्रीम्स विषयी ज्या तुम्ही घरीच बनवू शकता आणि तेही स्वस्तात पण याच्या वापराने तुमच्या पायांच्या भेगासुद्धा ठीक होतील हे नक्की...
तळपायाच्या भेगांसाठी होममेड क्रिम बनवण्याचा हा भन्नाट उपाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर priyasbeautytips नावाने पेजवर शेअर करण्यात आला आहे. चला तर जाणून घेऊया.
हे होममेड क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर एक कढई तापायला ठेवा ,कढई तापली कि त्यात मोहरीचं तेल टाका. आता जस हे तेल गरम होतं येईल तेव्हा त्यात मेणबत्तीचा तुकडा घाला.
हे सर्व मिश्रण व्यवस्थित गरम होऊद्या मेणबत्तीचा तुकडा हळू हळू वितळलायला लागेल, मग त्यात व्हॅसलिन घाला. हे करत असताना एक लक्षात ठेवा सर्व मिश्रण सतत ढवळत राहा गॅस मध्यम आचेवरच असुद्या,
मेणबत्ती आणि व्हॅसलिन पूर्णपणे वितळल्यावर त्यात ग्लिसरीन टाका आणि सर्व मिश्रण एकत्र करून घ्या. साधारण ५ ते ६ मिनिटे हे मिश्रण व्यवस्थित गरम होऊ द्या आता गॅस बंद करा, हे मिश्रण थोडं कोमट झालं कि एखाद्या काचेच्या बरणीत किंवा बाटलीत भरून ठेवा.
सकाळी पायातील मोजे काढून टाका हा उपाय आठवड्यातून दोनदा करा आणि काहीच दिवसात तुम्हाला फरक जाणवू लागेल.