Cooking Rise: भात शिजवायची करेक्ट पद्धत जाणून घ्या, नाहीतर होईल कँसर किंवा येईल हार्ट ऍटॅक?

तांदूळ नेमका कशा पद्धतीने शिजवला जावा याबाबात रिसर्च करण्यात ( reaserch on cooking rice) आला

Updated: Sep 29, 2022, 08:11 PM IST
Cooking Rise: भात शिजवायची करेक्ट पद्धत जाणून घ्या, नाहीतर होईल कँसर किंवा येईल हार्ट ऍटॅक? title=

Correct process of cooking rise: भारतात चपाती आणि भात खाणं खुप कॉमन (Eating rice and chapati)  आहे. विशेष करून भात खाण्याबाबत बोलायचं तर अनेकांना जेवणार भात नसेल तर जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. तुम्हाला डायबिटीस किंवा शुगर असेल तर मात्र तुम्हाला डॉक्टर जेवणातून भात कमी  सल्ला देतात (diabetes and eating rice). याला महत्त्वाची कारणे देखील आहेत. भाताचे अनेक प्रकार भारतात बनवले जातात. मात्र तुमची भात शिजवण्याची पद्धत चुकीची ( Correct way of cooking rice ) असेल तर तुम्हाला याचा मोठा फटका बसू शकतो. कारण चुकीच्या पद्धतीने तुम्ही भात शिजवला तर तुम्हाला थेट हृदयविकाराचा झटका ( Heart Attack) देखील येऊ शकतो किंवा कँसर ( Cancer) देखील होऊ शकतो. 

तांदूळ नेमका कशा पद्धतीने शिजवला जावा याबाबात रिसर्च करण्यात ( reaserch on cooking rice) आला. याबाबतचा अहवालही काही वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केला होता. या अहवालात तांदूळ किंवा आपण ज्याला बोली भाषेत भात म्हणतो तो नेमका कसा शिजवावा ( How to cook rice) , जेणेकरून आरोग्यासाठी तो फायदेशीर राहील यावर अभ्यास करण्यात आला. एकूण तीन पद्धतींनी हा अभ्यास करण्यात आला. 

हेही वाचा : Cholesterol Check: तळ हात आणि पाय देतात शरीरातील वाढत्या कोलेस्ट्रॉलबाबत अलर्ट, कसा जाणून घ्या

  • पद्धत नंबर १ - दोन तृतीयांश पाण्यात एक भाग तांदूळ शिजवला गेला 
  • पद्धत नंबर २ - पाच भाग पाणी आणि एक भाग तांदूळ असं प्रमाण घेऊन भात शिजवला गेला
  • पद्धत नंबर ३ - पाण्यात तांदूळ भिजवले गेले आणि त्यानंतर हा भात शिजवला गेला

निष्कर्ष काय निघाला? 

तीनही पद्धतींचा अभ्यास केला गेला. यानंतर यावरून निष्कर्ष काढले गेले. पहिल्या पद्धतीच्या तुलनेत भातातील हानिकारक अशा आर्सेनिकचे ( arsenic toxin)  प्रमाण पन्नास टक्के कमी झाल्याचं आढळून आलं. तर तीन ते चार तास भिजवलेल्या भातातून हे प्रमाण ऐंशी टक्के कमी झाल्याचं आढळलं. म्हणजेच तीन ते चार तास भिजत घातलेला भात  शिजवल्यास फायदा होत असल्याचं आढळून आलं. 

हेही वाचा : धक्कादायक! ढेकूण चावल्यावर होतात मानसिक आजार? वेळीच करा उपाय नाहीतर... 

कँसर आणि हार्ट ऍटॅकसाठी कसा हानिकारक ठरतो भात 

सध्या पिकं मोठ्या प्रमाणात यावीत यासाठी झाडांवर मोठ्या प्रमाणात फवारणी केली जाते, रासायनिक खतांचा वापर केला जातो. या फवारणीत आणि रासायनिक खतांमधील विषारी भाग हा भाताला दूषित करतो. भातात हे टॉक्सिन्स वाढल्याने तांदळातील आर्सेनिक नावाच्या विषाचं प्रमाण वाढतं. यामुळे तुम्हाला हार्ट ऍटॅक किंवा कँसरचा धोका वाढू शकतो. 

काही वर्षांपूर्वी झालेल्या या रिसर्चनुसार तांदूळ आधी तीन ते चार तास भिजत घालावे आणि नंतर ते तांदूळ शिजवल्यास आरोग्यसाठी अधिक फायद्याचा ठरतो. यामुळे आर्सेनिकचं प्रमाण कमी होतं. क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्ट (Queens University Belfast ) च्या तज्ज्ञांनी याबाबत संशोधन केलं होतं.