मुंबई : कोरोनाची लक्षणे काय आहेत, अशी विचारणा मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा होवू लागली आहे. तशी ही फार सामान्य वाटणारी लक्षणं वाटू शकतात, म्हणजे कधीतरी येणाऱ्या थंडी तापासारखी. पण एक किंवा एकापेक्षा जास्त लक्षणं ही कोरोनासारखीच असतील तर घाबरु नका. कोरोनाची टेस्ट नक्की करुन घ्या, पण त्या आधी ही लक्षण जाणून घ्या.
घशात खवखव किंवा घसा जड सुजल्यासारखा वाटू शकतो... न थांबणारा खोकला साधारण तासाभरापेक्षा जास्त वेळ येतो. दिवसभरात दोन ते तीन वेळेस असू होवू शकतं की अचानक न थांबणारा खोकला येतो.
शरीराचं तापमान 37.8C म्हणजे 100.4F पेक्षा जास्त असणे.
सर्वात महत्वाचं लक्षण आहे...
तुम्ही काहीही खाल्लं तरी पूर्वी जी चव तुम्हाला त्या पदार्थाची येत होती ती येत नाही, त्या पदार्थाची चव खूपच बदलली आहे, किंवा चव गेली आहे असं तुम्हाला वाटेल.
साधारण ही तीनही लक्षणं जाणवत असतील तर कोरोनाची टेस्ट जरूर करून घ्या, जोपर्यंत टेस्टचा निकाल येत नाही तो पर्यंत घरीच राहा, कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे घाबरुन जावू नका.