मुंबई : कोरोना संपूर्ण जगभरात थैमान मांडल आहे. चीनमधील वुहानपाठोपाठ हा कोरोना इटलीमध्ये हाहाकार माजवला आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे दिवसाला अडीच हजार लोकांचा बळी जात आहे. आतापर्यंत जगभरात १८ हजार ९०० पेक्षा अधिक लोकांचा बळी घेतला आहे. असं असताना कोरोनाने भारतात प्रवेश केला आहे. भारतात ५६२ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यात ११६ लोकांना. कोरोनावर अद्याप कोणतीही औषधे उपलब्ध नाहीत. पण कोरोनासोबत दोन हात करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती सर्वात महत्वाची आहे. या दिवसांत घाबरून न जाता घरी बसून आपली रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवू शकतो हे सांगतेय आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर.....
घरी राहणंं हा सर्वात महत्वाचा भाग
घरी जेवण जितकं शिजवून खावू त्यामधून जास्त रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते
आवळ्याचे पदार्थ खाल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते
WHO च्या सर्व महत्वाच्या टीप्स पाळते
पोहे, उपमा यासारख्या मराठमोळ्या पदार्थांनी रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते.
दुपारची एक छोटीशी झोप मिळाली तर फायदेशीर ठरेल
घरी आहात त्यामुळे जागं राहू नका.... वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा