कोरोनाच्या संकटात अशी वाढवा रोगप्रतिकारशक्ती

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या टिप्स  

Updated: Apr 7, 2020, 11:37 PM IST
 कोरोनाच्या संकटात अशी वाढवा रोगप्रतिकारशक्ती title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती अर्थात इम्युनिटी चांगली असणं आवश्यक असल्याचं बोललं जातं. रोगप्रतिकारशक्ती अधिक चांगली असल्यास, अशा लोकांना कोरोना व्हायरसची लागण होण्याचा धोका कमी असल्याची माहिती आहे. हीच बाब लक्षात घेता केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने लोकांना रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यााबाबत माहिती दिली आहे.

देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतोच आहे. देशभरात 4221 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर आतापर्यंत देशात 117 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ भारतासाठी मोठी चिंता वाढवणारी बाब आहे. कोरोनापासून वाचणं, कोरोनाची लागण होण्यापासून स्वत:चा बचाव करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत. संपूर्ण दिवसभर वेळोवेळी कोमट पाणी पिण्याबाबत सांगण्यात आलं आहे. दररोज 30 मिनिटांपर्यंत प्राणायम, योगासनं आणि मेडिटेशन करण्याचं सांगितलं आहे.

हळद, जिरं, धणे आणि लसूनचा जेवणात वापर करावा. सकाळी 10 ग्रॅम च्ववनप्राश आणि ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांनी शुगर फ्री च्ववनप्राश खावं. त्याशिवाय हर्बल टीचाही दररोजच्या खाण्या-पिण्यात समावेश करणं फायद्याचं ठरु शकतं. तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ, आलं, मनुका या सर्व पदार्थांचा हर्बल टीमध्ये समावेश करता येऊ शकतो.

दिवसांतून दोन वेळा हळद घातलेलं दूध पिणं फायदेशीर आहे. सुका खोकला असल्यास किंवा घशात खवखव होत असल्यास पुदीन्याची पानं खाण्याने किंवा ओव्याची वाफ घेण्यानेही फायदा होऊ शकतो. 

घशात खवखव असल्यास, कफ असल्यास लवंग पावडरमध्ये मध किंवा साखर टाकून दिवसांतून दोन ते तीन वेळा हे मिश्रण खाल्याने फायदा होऊ शकतो.