सरकारच्या मंजूरीनंतरही मेडिकल स्टोअरमध्ये मिळाणार नाही Corona Vaccine

परवानगी अपग्रेड केल्यामुळे, या लसी आता रुग्णालयं आणि दवाखान्यांमध्ये उपलब्ध होतील. मात्र या लसी मेडिकल स्टोअरमध्ये मिळणार नाहीत.

Updated: Jan 28, 2022, 03:23 PM IST
सरकारच्या मंजूरीनंतरही मेडिकल स्टोअरमध्ये मिळाणार नाही Corona Vaccine title=

मुंबई : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने Covishield आणि Covaxin या लसींना सशर्त मार्केट अप्रूवल दिलं आहे. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आतापर्यंत या लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी होती. परवानगी अपग्रेड केल्यामुळे, या लसी आता रुग्णालयं आणि दवाखान्यांमध्ये उपलब्ध होतील. मात्र या लसी मेडिकल स्टोअरमध्ये मिळणार नाहीत.

मंजूरीनंतर या लसी रूग्णालय आणि क्लिनिक इथून विकत मिळतील. पण या मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होणार नाहीत. लसीकरणाचा डेटा दर सहा महिन्यांनी DCGI कडे सादर करावा लागणार आहे. याशिवाय CoWIN अॅपवरही डेटा अपडेट केला जाईल.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी सांगितलं की, Central Drugs Standard Control Organisationने (केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना) आता कोवॅक्सीन आणि कोविशील्डची परवानगी अपग्रेड केली आहे. आतापर्यंत त्यांना आपत्कालीन वापरासाठी परवानगी होती. मात्र आता काही अटींसह लसी बाजारात आणण्यास परवानगी दिली आहे.

नवीन औषधं आणि क्लिनिकल चाचणी नियम, 2019 अंतर्गत ही मान्यता देण्यात आली आहे. सध्याच्या प्रकरणात, भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया दोन्ही क्लिनिकल चाचण्यांमधून डेटा सबमिट करतील. सर्व लसीकरण डेटा CoWIN प्लॅटफॉर्मवर रेकॉर्ड केला जाईल. 

मिळालेल्या लेल्या माहितीनुसार Covishield आणि Covaxin खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्यास, त्यांची किंमत प्रति डोस 275 रुपये निश्चित केली जाऊ शकते. तसंच लसीच्या डोसवर 150 रुपये अतिरिक्त सेवा शुल्क देखील आकारलं जाईल. म्हणजेच एका लसीच्या डोसची किंमत खुल्या बाजारात सुमारे 425 रुपये असण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय औषध नियामक प्राधिकरणाला (NPPA) लसीची किंमत सर्वसामान्यांना परवडावी यासाठी किंमत निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या खाजगी रुग्णालयांमध्ये कोवॅक्सिनच्या एका डोसची किंमत 1,200 रुपये आणि कोविशील्डची किंमत 780 रुपये प्रति डोस ठेवण्यात आली आहे. यामध्ये 150 रुपये सेवा शुल्क देखील समाविष्ट आहे.