कोरोना पुन्हा चिंता वाढवतोय; ऑगस्ट महिन्यात तब्बल 157 रूग्णांचा मृत्यू

ऑगस्टमध्ये मृत्युमुखी पडलेल्या बहुतेक कोविड-19 रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होती.

Updated: Sep 2, 2022, 06:21 AM IST
कोरोना पुन्हा चिंता वाढवतोय; ऑगस्ट महिन्यात तब्बल 157 रूग्णांचा मृत्यू title=

दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ऑगस्ट महिन्यात कोरोनामुळे 157 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जी गेल्या 6 महिन्यांतील सर्वाधिक आहे. या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये दिल्लीत कोरोनामुळे 257 मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. 3 मे 2021 रोजी दिल्लीत एका दिवसात कोरोनामुळे सर्वाधिक 448 मृत्यू झाले.

एका इंग्रजी वेबसाईटच्या अहवालानुसार, ऑगस्टमध्ये मृत्युमुखी पडलेल्या बहुतेक कोविड-19 रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होती. किंवा या व्यक्तींना आधीच कॅन्सर, टीबी, एड्स, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी समस्या होत्या. 

दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील महिन्यात, 12 ऑगस्ट रोजी 10 मृत्यूची नोंद झाली होती, जी 13 फेब्रुवारी रोजी 12 मृत्यूंनंतर एका दिवसात सर्वाधिक होती. 9 ऑगस्टनंतर मृतांची संख्या कमी होत असल्याची नोंद आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, दिल्लीतील मोठ्या संख्येने प्रौढ लोकसंख्येला अद्याप कोविड -19 विरूद्ध लसीचा तिसरा डोस मिळालेला नाही. कोविड-19 संसर्गाच्या बाबतीत आणि मृत्यूच्या बाबतीतही इतर आजारांनी ग्रासलेल्या लोकांची लक्षणीय संख्या गंभीर लक्षणांना बळी पडते.

लोकनायक रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश कुमार म्हणतात की, ज्यांनी कोरोना लसीचा तिसरा डोस घेतलेला नाही त्यांना तो लवकरात लवकर घ्या. तिसरा डोस घेणाऱ्यांची संख्या आधीच वाढलीये. त्याचबरोबर आयसीयूमध्ये रुग्णांच्या दाखल होण्याचे प्रमाणही घटलं असून मृत्यूचं प्रमाणही कमी झालंय.