Tomato Flu : कोरोनाची (Corona) साथ आटोक्यात येत असतानाच आता एका नव्या आजाराचा धोका वाढलाय. केरळ (Kerala) आणि कर्नाटकमध्ये (Karnataka) 'टोमॅटो फ्लू'च्या (Tomato Flu) रुग्णांची संख्या वाढलीय... केरळच्या कोवलम परिसरात टोमॅटो फ्लूचे रुग्ण पहिल्यांदा आढळले. हा संसर्गजन्य रोग असल्यानं महाराष्ट्रातही (Maharashtra) सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत. लहान मुलांमध्ये हा आजार झपाट्यानं पसरतोय.
काय आहे 'टोमॅटो फ्लू' आजार?
टोमॅटो फ्लू हा विषाणूजन्य आजार आहे. रुग्णाच्या त्वचेवर टोमॅटोच्या आकारातील लाल रंगाचे लहान-लहान पुरळ येतात. त्यामुळं त्याला टोमॅटो फ्लू नाव देण्यात आलंय. पुरळ येणे, ताप, त्वचेची जळजळ ही आजाराची लक्षणं आहेत. रुग्णांना सांधेदुखी, मळमळ आणि उलट्या होतात
लहान मुलांमध्ये हा आजार वाढतोय.. पण नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन सरकारनं केलं आहे.
टोमॅटो फ्लूबाबत अधिक तपशील समोर आलेला नाही. या आजाराचे रुग्ण अद्याप महाराष्ट्रात आढळलेले नाहीत. पण सर्वांनी आतापासूनच खबरदारी घेण्याची गरज आहे.