दिल्ली : दिल्लीत कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉनचे सब-व्हेरियंटमुळे सापडल्याने त्याचा वेग झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत राजधानीत 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 2031 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्ली आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत सध्या 8,105 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासांत 2260 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. त्याच वेळी, कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट 12.34% आहे.
मात्र, शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कोरोना प्रकरणांची परिस्थिती बिकट नव्हती. शुक्रवारी राजधानीत कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर नवीन कोरोना रुग्णांची संख्या 2136 झाली आहे. शुक्रवारी कोरोनाचा सकारात्मकता दरही 15.02 टक्के होता.
दिल्लीच नाही तर संपूर्ण देशात पुन्हा एकदा कोरोनाने जोर पकडला आहे. मात्र, शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी देशभरातील आकडेवारीत किंचित घट झाली आहे. शनिवारी देशात कोरोनाचे 15 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. पण पॉझिटीव्हीटी रेट चिंताजनक आहे. देशातील कोरोनाचा सकारात्मकता दर चार टक्क्यांच्या पुढे आहे.
दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शनिवारी 486 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,07,419 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97.9 टक्के इतका झाला आहे. गेल्या 24 तासांत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही.
सध्या मुंबईत 4,624 रुग्ण आहेत. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 1372 दिवसांवर गेला असल्याची माहिती आहे.