मुंबई : उन्हाळ्यात धूळ, प्रदषूण, कडक ऊन यांपासून केसांचे संरक्षण करण्यासाठी आणि केसांचे पोषण करण्यासाठी काही घरगुती मास्क फायदेशीर ठरतात. शॅम्पू, कंडीशनिंगसोबत हेअर मास्क तुमच्या केसांचे सौंदर्य अधिक खुलवले. तसंच तुम्हाला कुलिंग इफेक्टचा अनुभव घेता येईल. पाहुया उन्हाळ्यात केसांसाठी उत्तम असलेले हेअर मास्क...
उन्हाळ्यात दही खाणे जितके फायदेशीर असते तितकेच केसांचे पोषण होण्यासाठीही उपयुक्त ठरते. दह्यामुळे केसांचे उत्तमरित्या कंडीशनिंग होते. केस चमकदार व मुलायम होतात. त्याचबरोबर कोंड्याची समस्याही दूर होते. त्यासाठी केसांना दही लावा आणि ३० मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा.
दुधात प्रोटीन असते. जे केसांसाठी उपयुक्त ठरते. केस घनदाट, मुलायम होण्यासाठी दुधाचा मास्क लावणे फायदेशीर ठरले. त्यासाठी एक कप दूधात काही थेंब ऑलिव्ह ऑईल आणि मध घाला. याचे नीट मिश्रण बनवून केसांना लावा. सुकल्यानंतर केस सौम्य शॅम्पूने धुवा.
भाताच्या पाण्यात खूप सारे व्हिटॉमिन्स असतात. त्यामुळे केसांचे पोषण होते. भाताचे पाणी केसांना लावल्याने केस स्वच्छ होतात. तसंच भाताच्या पाण्यात आवळा, शिकेकाई आणि संत्र्याच्या सालीची पावडर एकत्र करुन ते मिश्रण केसांना लावा. त्यामुळे केसांचे चांगले पोषण होईल.