पावसाळ्यात दह्याचं सेवन करणं आरोग्यासाठी अपायकारक? जाणून घ्या सत्य!

उन्हाळ्यात दही खाणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं, परंतु पावसाळ्यात दही खावं का?

Updated: Jul 17, 2022, 06:34 AM IST
पावसाळ्यात दह्याचं सेवन करणं आरोग्यासाठी अपायकारक? जाणून घ्या सत्य! title=

मुंबई : नियमितपणे दही खाणं शरीरासाठी फायदेशीर असतं. दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात आणि त्यांचा आपल्या आरोग्याला त्याचा फायदा होतो. दह्यात प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, शुगर, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक, कॉपर, सेलेनियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन के, फॅटी ऍसिडस् असे अनेक पोषक घटक आढळतात. त्यामुळे दही शरीरासाठी किती फायदेशीर असतं.

पावसाळ्यात दही खावे का?

मात्र आता पावसाळा सुरू आहे. उन्हाळ्यात दही खाणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं, परंतु पावसाळ्यात दही खावं का? याविषयी अनेकांना फारशी माहिती नसते. पावसाळ्यात आपली पचनशक्ती कमजोर असते. त्यामुळे या ऋतूत दही खाणं अतिशय फायदेशीर असते. परंतु याचं सेवन करताना काही काळजी घेणं गरजेचं असतं.

पावसाळ्यात दही खाताना ते खूप आंबट किंवा खूप दिवस जुनं नसावं. तसंच पावसाळ्यात रात्रीच्या वेळेस दही खाणं शक्यतो टाळावे. परंतु दिवसा तुम्ही जेवणासोबत दही खाऊ शकता. पावसाळ्यात अनेकदा फूड पॉयझनिंगचा आणि डायरियाचा होतो. अशा स्थितीत दही खाणं आणि ताक पिणं फायदेशीर ठरू शकतं. 

पावसाळ्यात दही खाल्ल्याने हाडं होतात मजबूत

दह्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतं. त्यामुळे दही खाल्ल्याने हाडं मजबूत होतात आणि दातही निरोगी आणि मजबूत बनण्यास मदत होतं.