Belly fat: आजकाल बऱ्या लोकांची समस्या ही बेली फॅट असते. चुकीच्या जीवनशैलीमुळे आजकाल बेली फॅट वाढण्याची समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत करत असाल मात्र अनेकदा त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. सध्या तरूण व्यक्तींमध्येही बेली फॅट (Belly Fat) वाढण्याची समस्या दिसते. चुकीची जीवनशैली (Wrong Lifestyle) आणि अयोग्य आहार (proper diet) यामुळे पोटवर अधिक चरबी वाढू लागते. बेली फॅट (Belly Fat) कमी करण्यासाठी आपण अनेक जण विविध पद्धतींचा अवलंब करतो.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वजन कमी करण्याच्या तुमच्या मार्गामध्ये तुम्हाला तुमच्या आहाराकडे, विशेषतः तुमच्या सकाळच्या दिनचर्येकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. सकाळच्या वेळी अशा आहारातील पदार्थांचे सेवन केले पाहिजे ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेलं राहतं. त्यामुळे सकाळच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे, याची माहिती घेऊया.
बरेच लोक वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. ज्यामध्ये एका वेळेचं जेवण टाळणं, जिममध्ये तासनतास घाम गाळणे, परंतु अनेक वेळा या सर्व गोष्टी करूनही वजन कमी होताना दिसत नाही. याचं कारण काय आहे, माहीत आहे का?
यामागील कारण म्हणजे तुमच्या आहारात केलेल्या चुका याच्याशी संबंधित असू शकतात. ज्याकडे तुम्ही लक्ष देत परिणामी वजन कमी होण्यास अडथळा निर्माण होतो.
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या आहाराकडे विशेषत: तुमच्या सकाळच्या दिनचर्येकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. अशा आहारातील पदार्थांचे सेवन सकाळच्या वेळी करावे ज्यामुळे तुमचं पोट जास्त काळ भरलेलं राहण्यास मदत होते.
जर तुम्हाला बेली फॅटची समस्या असेल आणि तुम्हाला पोटावरील चरबी कमी करायची असेल तर तुम्ही तुमच्या आहारात चिया बियांचा समावेश करू शकता. चिया बियांमध्ये विशेषतः फायबर असते, जे तुम्हाला जास्त काळ पोटभर ठेवण्यास मदत करू शकतं. परिणामी याचा वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.
चिया बियांमध्ये जास्त प्रमाणात फायबर असतं. यांच्या सेवनामुळे तुमचं शरीरात पचन मंद प्रमाणात होऊ लागतं. त्याशिवाय रक्तामध्ये ग्लुकोज झपाट्याने वापरले जाते. ते तुमचे चयापचय सुधारू शकतं, जे तुमचं वजन कमी करण्यात मदत करू शकते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)