डोळ्यांच्या रंगावरून स्वभावातील या '७' गोष्टी समजतात

डोळे हे फार बोलके असतात. ज्या गोष्टी आपण बोलू शकत नाही त्याबद्दलचे संकेत अनेकदा डोळ्यातून बोलून जातात. म्हणूनच डोळ्यांचा रंगदेखील यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. पहा डोळ्यांचा रंग आणि त्यामधून प्रकट होणार्‍या भावनांमागील अर्थ कसा ओळखाल? 

Updated: Nov 21, 2017, 07:59 AM IST
डोळ्यांच्या रंगावरून स्वभावातील या '७' गोष्टी समजतात  title=

मुंबई : डोळे हे फार बोलके असतात. ज्या गोष्टी आपण बोलू शकत नाही त्याबद्दलचे संकेत अनेकदा डोळ्यातून बोलून जातात. म्हणूनच डोळ्यांचा रंगदेखील यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. पहा डोळ्यांचा रंग आणि त्यामधून प्रकट होणार्‍या भावनांमागील अर्थ कसा ओळखाल? 

अनेकदा डोळ्यांचा रंग गडद म्हणजे त्यांच्यावर अधिक विश्वास ठेवला जातो. पण अशा व्यक्ती विश्वासू असेलच असे नाही. एका अभ्यासाच्या अहवालानुसार, डार्क ब्राऊन डोळ्यांचा रंग असणारी व्यक्ती अधिक विश्वासू असते.   
  
ज्या व्यक्तींचे डोळे ब्राऊन, काळे आणि गडद  असतात अशा व्यक्ती  मद्यसेवनानंतर स्वतःला फार चांगल्या प्रकारे सांभाळू शकत नाहीत. 
  
हलके  हिरवे किंवा निळे डोळे असणार्‍या व्यक्ती साधारणपणे फार मित्र मंडळींमध्ये रमत नाहीत. ते शांत असतात. 

 हलक्या रंगाचे डोळे असणार्‍या व्यक्ती अधिक वेदना सहन करू शकतात. या उलट गडद रंगांच्या डोळ्याच्या व्यक्ती फार पटकन रिअ‍ॅक्ट करतात. त्यांना वेदना सहन करणं कठीण असतं.  
 
डोळ्यांचा रंग गडद असणार्‍या व्यक्ती उत्तम खेळाडू असू शकतात. प्रामुख्याने रिअ‍ॅक्टीव्ह स्पोर्ट्समध्ये या व्यक्ती अधिक चांगल्या प्रकारे काम करतात. 

गर्भामध्ये असताना टेरस्टेरॉन जितकी अधिक तितका डोळ्यांचा रंग अधिक गडद असतो. त्यामुळेच जितके गडद डोळे तितक्या व्यक्ती अधिक हुकुमशाही असतात. याउलट हलक्या रंगाच्या व्यक्ती शांत असतात. 
   
गडद काळ्या किंवा ब्राऊन रंगाच्या व्यक्ती या अधिक चांगल्या प्रकारे माहिती प्रोसेस करतात.