Cholesterol नसलेला चवीष्ट ब्रेकफास्ट करायचाय? वापरा या सोप्या टीप्स

Cholesterol हा सध्या प्रत्येकाचाच शत्रू झाला आहे. शरीरातील या शत्रूचं प्रमाण वाढल्यानंतर उदभवणाऱ्या अडचणी गंभीर वळणावर पोहोचल्यामुळे आता Cholesterol फ्री जीवनशैलीकडे सर्वांचच कल दिसून येत आहे.   

Updated: Oct 17, 2022, 08:00 AM IST
Cholesterol नसलेला चवीष्ट ब्रेकफास्ट करायचाय? वापरा या सोप्या टीप्स  title=
Cholesterol Free and Healthy Breakfast ideas

Cholesterol Free and Healthy Breakfast: Cholesterol हा सध्या प्रत्येकाचाच शत्रू झाला आहे. शरीरातील या शत्रूचं प्रमाण वाढल्यानंतर उदभवणाऱ्या अडचणी गंभीर वळणावर पोहोचल्यामुळे आता Cholesterol फ्री जीवनशैलीकडे सर्वांचच कल दिसून येत आहे. कोलेस्ट्रॉलचा शरीरावर होणारा एकंदर परिणाम पाहता आता हा घटक नसणाऱ्या अन्नपदार्थांकडे अनेकांचाच कल दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्यानं दिवसाची सुरुवात करतानाच खाल्ल्या जाणाऱ्या Breakfast ला अनेकांनीच केंद्रस्थानी ठेवलं आहे. 

सकाळच्या वेळी पराठे (Paratha), समोसे (Samosa), वडा-भजी (batata wada) खाणं योग्य नाही. खाण्यासाठी हे पदार्थ चवीला कितीही चांगले असले तरीही त्यामध्ये असणारी कोलेस्ट्रॉलची पातळी मात्र धोकादायक आहे हे नाकारता येणार नाही. त्यामुळं जीभेचे चोचले पुरवत आता तुम्हीही कोलेस्ट्रॉल फ्री न्याहारीकडे वळणं गरजेचं आहे. 

अधिक वाचा : खरी अंडी आणि खोटी अंडी कशी ओळखाल? जाणून घ्या...

 

प्रथिनांचा समावेश करा- अनेक आहारतज्ज्ञांच्या मते आहारात प्रोटीन्स म्हणजेच प्रथिनांचा (Proteins) समावेश करणं उत्तम पर्याय. असं असलं तरीही बऱ्याचदा यामुळं कोलेस्ट्रॉल वाढतं. ज्यामुळं अंडी (Eggs), मांस (meat), मासे (Fish) यांचं सेवन करताना त्यांना पर्यायी आहार म्हणूनही पालेभाज्या (leafy vegetables), भाज्या, कडधान्य अशा पर्यायांना निवडावं. 

पॅनकेक्स एक उत्तम पर्याय- पॅनकेकमध्ये असणारे काही घटक कमी करुन त्यांना योग्य पर्यायी पदार्थांनी बदलल्यास हा एक संतुलित ब्रेकफास्ट ठरू शकतो. Pancake मध्ये साखरेऐवजी गोड चवीसाठी मधाचा (honey) वापर, फायबरसाठी चेरी (Cherry), दालचिनी (dalchini), आल्याचा (ginger) वापर आणि मैद्याऐवजी गव्हाच्या पीठाचा वापर फायद्याचा ठरु शकतो. 

अधिक वाचा : भूक न लागणे, चव नसणं ही आहेत या गंभीर आजाराची लक्षणे!

 

अन्नपदार्थ खरेदी करण्यापूर्वी काळजी घ्या 
अन्नपदार्थ खरेदी करताना कायम त्याच्यावर देण्याक आलेला न्यूट्रिशन लेबल पाहून घ्या. ज्यामध्ये साखर आणि फॅटचं प्रमाण कमी आहे अशाच पदार्थांना पसंती द्या. यामुळंही तुम्ही नको असलेल्या कोलेस्ट्रॉलपासून दूर राहू शकता. 

सकाळच्या वेळी नाश्ता करताना त्यामध्ये ब्लॅक टी, ग्रीन टी, ऑरेंज ज्युस (juice) या पेयांना पसंती द्या. यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं शरीरातील पाण्याची पातळीही नियंत्रणात राहते.