खरी अंडी आणि खोटी अंडी कशी ओळखाल? जाणून घ्या...

बाजारमध्ये खोटी अंड्यांमुळे तुमची होऊ शकते फसवणूक, असा ओळखा खऱ्या आणि खोट्या अंड्यामधील फरक!

Updated: Oct 17, 2022, 12:51 AM IST
खरी अंडी आणि खोटी अंडी कशी ओळखाल? जाणून घ्या... title=

Real Egg and Artificial Eggs : काही दिवसांनी हिवाळा चालू होईल त्यामुळे बाजारात आता अंड्यांची मागणीही वाढेल.  आरोग्यासाठी अंडी फायदेशीर मानली जातात. काही ठिकाणी कमी दरामध्ये अंडी मिळतात मात्र ती अंडी खोटी असू शकतात. जर तुम्हाला अशी खोटी अंडी ओळखायची असतील तर खाली काही गोष्टी दिल्या आहेत. त्यावरन तुम्ही खऱ्या आणि खोट्या अंड्यांमधील 
फरक ओळखू शकता. 

खरं अंड ओळखण्यासाठी अंड्याचं कवच पुरेसं आहे, जर तुम्ही अंड्याचे कवच आगीच्या संपर्कात आणलं तर ते वेगाने पेट घेतं. कारण ते प्लास्टिकसारख्या वस्तूपासून बनलेली असतात. पण जेव्हा खरं अंड आपण आगीच्या संपर्कात आणतो तेव्हा कवचाला आग  लागत नाही. खरे अंडे आगीत टाकले की काही वेळाने ते काळं होतं.

ही पद्धत खरी आणि बनावट अंडी ओळखण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. अंडी हातात हलवल्यावर नकली अंड्यातून आवाज येतो, तर खऱ्या अंड्यासोबत तसा आवाज येत नाही.

खरी आणि बनावट अंडी देखील अंड्यातील पिवळं बलकानेहीओळखली जाऊ शकतात. जेव्हा तुम्ही खऱ्या अंड्याचे बलक पाहाल तेव्हा ते बलक वेगळं दिसेल. तर बनावट अंड्यातील पिवळ्या भागामध्ये पांढरा द्रव मिसळलेला दिसेल.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)