Cholesterol Control Drink : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रामबाण उपाय, आजार राहिल कोसो दूर

Cholesterol Control Drinks : हृदय निरोगी ठेवण्यासाठी Cholesterol ची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. Cholesterol  नियंत्रित करण्यासाठी अनेक लोक विविध प्रकारची औषधे घेण्यास सुरुवात करतात. पण हा घरगुती उपाय केला तर तुमचे Cholesterol कमी होईल.

Updated: Jan 25, 2023, 02:54 PM IST
Cholesterol Control Drink : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रामबाण उपाय, आजार राहिल कोसो दूर title=
Cholesterol News

How To Reduce Cholesterol : शरीर निरोगी ठेवण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पदार्थांचे सेवन करतात, तर शरीर निरोगी ठेवण्यासाठी हृदय निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेकजण विविध औषधे घेण्यास सुरुवात करतात. (Health Tips in Marathi News) पण असे केल्याने तुमचे आरोग्यही बिघडू शकते.अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात काही घरगुती ड्रिंकचा समावेश करु शकता. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कोणत्या ड्रिंकचा समावेश करावा हे जाणून घ्या.  (Health in Marathi News)

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हे ड्रिंक प्या 

ड्रिंक बनवण्यासाठी घरगुती साहित्य -

एक चमचा मेथीचे दाणे, दालचिनीचे 3 तुकडे, एक चमचा किसलेले आले, स्टार बडीशेप (चक्रफूल), एक आलसी.

ड्रिंक बनवण्याची योग्य पद्धत-

हे ड्रिंक बनवण्यासाठी एक ग्लास पाणी गरम करा. आता या पाण्यात मेथी दाणे, दालचिनीचे तुकडे, आले आणि आलसी टाका आणि हे पाणी 4 मिनिटे उकळावा. पाण्याला चांगली उकळी आल्यावर ते पाणी गाळून घ्या आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळ आणि त्यानंतर हे ड्रिंक प्या.

हे ड्रिंक पिण्याचे खूप फायदे-

  • हे ड्रिंक प्यायल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि शरीर निरोगी राहते.
  • हे ड्रिंक प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते आणि हृदय देखील निरोगी राहते.
  • या घरगुती ड्रिंकमध्ये अँटीफंगल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात.
  • या ड्रिंकमध्ये भरपूर फायबर आढळते जे पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करते.

हे ड्रिंक अशा प्रकारे प्या-

तुम्ही हे घरी बनविलेले ड्रिंक दिवसा कोणत्याही वेळी पिऊ शकता. पण लक्षात ठेवा की हे ड्रिंक कधीही रिकाम्या पोटी पिऊ नका. दुसरीकडे, जर तुम्हाला अॅलर्जी किंवा इतर कोणताही आजार असेल तर तुम्ही हे ड्रिंक पिणे टाळावे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x