चट्ट्म स्वाहा! तुमच्या जिभेचे चोचले पुरविणार आता 'आयुर्वेदिक' पाणीपुरी

पाणीपुरी हे सर्व सामान्यांचं आवडतं खाद्य... परंतु, याच पाणीपुरीतील पाण्यामुळे अनेक जण ते खाण्यासाठी नाराज असतात. मात्र, या समस्येवर नाशिकच्या एका व्यावसायिकांनं अगदी जालीम तोडगा काढलाय.  

Updated: Apr 21, 2022, 05:44 PM IST
चट्ट्म स्वाहा! तुमच्या जिभेचे चोचले पुरविणार आता 'आयुर्वेदिक' पाणीपुरी title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिक शहरातील सिडको परिसरात खाऊ गल्ली मध्ये मिळणारा दत्तू शेळके यांच्या मालकीचं पाणीपुरीच्या दुकान आहे. मात्र, रस्त्यावर मिळणाऱ्या पाणीपुरीप्रमाणे ही पाणीपुरी नाही. आपल्या दहा ते वीस रुपयांच्या पाणीपुरीपेक्षा ही पाणीपुरी थोडी महाग आहे. तरीही खवय्ये या पाणीपुरीला पसंती देत आहेत.

या पाणीपुरीत असलेल्या वैशिष्टय यामुळे ती खवय्यांच्या पसंतीला उतरत आहे. या पाणीपुरीच्या पाण्यात आवळा, तुलसी, बेहडा, पिंपरी, मिरे. पुदिना, मेथी, गुळ आले यश शरीर डिटॉक्स करणारे औषध वापरले आहेत. तब्बल 40 प्रकारचे आयुर्वेदिक घटक या पाणीपुरीच्या पाण्यात वापरले आहेत.

असे असले तरी चव मात्र बदललेली नाही. जिभेचे चोचले पुरवणारी चटपटीत चव यामध्ये आपल्याला चाखायला मिळते. या पाण्याचं आता लवकरच पेटंटही घेण्यात येणार आहे. 

दत्तू शेळके यांनी अस्वच्छतेमुळे पाणीपुरीपासून अलिप्त असलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही 'हायजेनिक' पाणीपुरी सुरु केलीय. आयुर्वेदिक पाण्याने आजच्या हेल्दी लाइफस्टाईलमध्ये हिरव्या पाणीपुरीमुळे जिभेचे चोचले पूर्ण होतील हे निश्चित..