'या' फेसपॅकने चुंंबकाप्रमाणे खेचली जाते त्वचेवरील घाण,मळ

उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा तेलकट, चिपचिपित होण्यासाठी अनेक कारणं असतात. 

Updated: May 19, 2018, 07:12 PM IST
'या' फेसपॅकने चुंंबकाप्रमाणे खेचली जाते त्वचेवरील घाण,मळ  title=

 मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा तेलकट, चिपचिपित होण्यासाठी अनेक कारणं असतात. तीव्र ऊन, घाम, सोबत प्रदुषण, धूर, धूळ यामुळे त्वचेचे नुकसान होते. त्वचेवर ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स येण्याचं प्रमाण वाढते. सोबतच अ‍ॅक्नेचा त्रासही बळावतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेचे अधिक प्रमाणात नुकसान होते. अशावेळेस त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी काही खास पॅक फायदेशीर ठरतात.  

 चारकोल फेसपॅक  

 चारकोल म्हणजे कोळसा. तुम्हांला कदाचित आश्चर्य वाटेल मात्र अ‍ॅक्टिव्हेटेड चारकोलच्या वापरामुळे त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी मदत होते. चुंबकाप्रमाणे त्वचेमध्ये दडलेला मळ, घाण दूर करण्यास चारकोल मदत करतात. आजकाल बाजारामध्ये अ‍ॅक्टिव्हेडेट चारकोलचे फेसवॉश, पिल ऑफ, पावडर उपलब्ध आहेत. 

 
 कसा कराल चारकोलचा वापर ?  

 बाजारात अ‍ॅक्टिव्हेटेड चारकोलचे फेसवॉश उपलब्ध आहेत. सोबतच कॅप्सुल आणि पावडरही उपलब्ध आहे. त्याचा वापर तुम्ही त्वचेच्या पोतानुसार बाजारात उपलब्ध असलेल्या पिल ऑफ क्रीममध्ये मिसळून लावू शकता.  

 चारकोलचे फायदे -  

 चारकोल पावडर चेहर्‍यावर लावल्याने टॅनिंगची समस्या आटोक्यात राहते. याकरिता चारकोल पावडर पाण्यात मिसळून लावल्याने टॅनिंग कमी होण्यास मदत होते. 
 
 पिल ऑफ सोबत चारकोल पावडर मिसळा. चेहर्‍यावर हा फेसपॅक लावा. हलका थर लावल्यानंतर तो पूर्णपणे सुकू द्यावा. यानंतर तो खेचून काढा. चारकोल पिल ऑफ़ फेसपॅकमध्ये त्वचेवरील मृत पेशींचा थर कमी होतो. अ‍ॅक्ने, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स कमी होतात. परिणामी चेहर्‍यावरील छिद्र मोकळी होतात. 
 
 तेलकट त्वचा असणार्‍यांसाठी चारकोल फेसपॅक फायदेशीर ठरतो. चारकोल फेसपॅकमुळे त्वचा मोकळी होण्यास मदत होते. यानंतर मॉईश्चरायझर लावणं गरजेचे आहे. 
 
 डार्क अंडरआर्म्सचा त्रासही कमी करण्यास चारकोल फेसपॅक मदत करतात. एक मोठा चमचा चारकोल पावडर चमचाभर मधासोबत मिसळा. या मिश्रणचा थर अंडरआर्म्समध्ये लावा. यानंतर 20 मिनिटांनी टॉवेलच्या मदतीने हा पॅक स्वच्छ पुसावा. यामुळे डार्क अंडरआर्म्सचा त्रास कमी होण्यास मदत होते.