मुंबई : बदललेल्या जीवनशैलीमुळे खाण्या-पिण्याच्या सवयींकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. यामधील एक आजार म्हणजे मधुमेह. मधुमेही रूग्णांना काय खावं आणि काय खाऊ नये हा मोठा प्रश्न असतो.
अशावेळी अनेकजण विचार करतात की, मधुमेही रूग्णांनी गुळाचा चहा प्यावा की नाही. तर आज याचबद्दल जाणून घेऊया.
गुळाचा चहा मधुमेही रूग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतो, मात्र याचं सेवन करताना रूग्णांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
गूळ हे साखरेपेक्षा आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. गुळात फॉफरस, आयर्न, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतं. त्याचप्रमाणे यामध्ये अनेक व्हिटॅमिन आणि खनिजं असतात.
मधुमेही रूग्ण गुळाचा चहा पिऊ शकतात. यामुळे जास्त नुकसान होत नाही. मात्र यावेळी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे, याचं प्रमाणात सेवन करायचं आहे. कारण गुळ हे गरम असतं. अशा वेळी गूळ खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते, पण रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो.