Counting calories: फीट आणि फाईन आजकाल प्रत्येकाला रहायचं असतं. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकदा वजन आणि कॅलरीजमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतं.ज्यावेळी वजन कमी करण्याची वेळ येते तेव्हा लोकांना निरोगी आहार घेण्याचा आणि अतिरिक्त कॅलरी बर्न करण्याचा सल्ला दिला जातो. यावेळी अनेकजण काहीही खाण्याचे पदार्ख खरेदी करण्यापूर्वी त्यात असलेली साखर, पोषण आणि कॅलरीज तपासतात. पण तुम्हाला माहितीये का आपल्या शरीराला कॅलरीज खूप महत्वाच्या आहेत.
आपल्या शरीराला योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी पुरेशा प्रमाणात कॅलरीजची आवश्यकता असते. K@NJR हे आपल्या अन्नातील ऊर्जा मोजण्याचे एकक आहे. म्हणजे आपण जे काही अन्न किंवा पेये घे पितो ते कार्बोहायड्रेट, चरबी किंवा प्रथिने असो या सर्वांच्या आत पोषक घटक असतात आणि ते शरीरात जाऊन आपल्या शरीराला ऊर्जा देतात.
तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार,जर आपण अन्नातून मिळणाऱ्या कॅलरीजचा योग्य वापर केला नाही तर त्या चरबीचं रूप घेतात. ही चरबी आपल्या शरीरात जमा होते आणि लठ्ठपणा वाढतो. त्यामुळे जास्त कॅलरीज प्रमाण जास्त असू नये.
वजन कमी करण्याच्या नादात अनेकजण कॅलरी जास्त कॅलरीज बर्न करणं हानिकारक ठरू शकतं. लोक वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरी वापरतात किंवा जास्त व्यायाम करतात. यामुळे शरीराला योग्य प्रमाणात पोषण आणि एनर्जी मिळत नाही. अशावेळी थकवा, अशक्तपणा, अपचन, हे त्रासही होऊ शकतात.
आपल्या शरीराला दररोज एका ठराविक प्रमाणातील कॅलरीजची गरज असते. महिलांनी दिवसाला 1800 कॅलरीज घ्याव्यात. तर पुरुषांनी दिवसाला 2000 कॅलरीज घेणे आवश्यक आहे. परंतु जर एखाद्याच्या शरीराला आवश्यकतेनुसार कॅलरीज मिळत नसतील तर शरीर त्या चरबीपासून बनवण्यास सुरुवात करतं त्यामुळे दररोज शरीराच्या आवश्यकतेनुसार कॅलरीज घेणे अत्यंत आवश्यक आहे.
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी कॅलरी खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे वय आणि शरीराच्या ठेवणीनुसार आहार घ्या. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करणेही महत्त्वाचे आहे. जेणेकरून ते चरबीच्या रूपात साठवले जाणार नाही.