Breast infection and home remedies: लाजू नका! Breast जवळ इन्फेक्शन झालं असेल तर 'हे' उपाय करा...

ब्रेस्ट इन्फेक्शन झाल्यास आसपासच्या भागात खाज ( Inflamation near breast) येणं. सूज (swelling) येणं, रॅशेस (rashes) , लाल पुरळ (red spots)  येणं अशा समस्यांचा महिलांना सामना करावा लागतो. 

Updated: Aug 21, 2022, 04:51 PM IST
Breast infection and home remedies: लाजू नका! Breast जवळ इन्फेक्शन झालं असेल तर 'हे' उपाय करा... title=

Breast infection cure tips: ब्रेस्ट इन्फेक्शन (Breast Infection) ही महिलांसाठी एक कॉमन समस्या आहे. अनेक महिला याकडे दुर्लक्ष करतात. मात्र असं दुर्लक्ष करणं अत्यंत धोकादायक असल्याचं डॉक्टर्स सांगतात. ब्रेस्टच्या आसपास इन्फेक्शन होण्याची विविध कारणं आहेत. यामध्ये घट्ट ब्रा वापरणं (Tight Bra), वायर ब्रा (Wired Bra ) वापरणं किंवा खूप (Sweating) घाम येणं ही त्यातील कॉमन कारणं. 

ब्रेस्ट इन्फेक्शन झाल्यास आसपासच्या भागात खाज ( Inflamation near breast) येणं. सूज (swelling) येणं, रॅशेस (rashes) , लाल पुरळ (red spots)  येणं अशा समस्यांचा महिलांना सामना करावा लागतो. उन्हाळा आणि पावसाळ्यात महिलांना ब्रेस्ट इन्फेक्शनचा सर्वाधिक त्रास होतो. या समस्येपासून सुटकारा मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. जाणून घेऊयात याच उपायांबाबत. 

बर्फाचा वापर (Use Of Ice)

ब्रेस्ट इन्फेक्शनमुळे सूज आली असेल तर बर्फाचे खडे वापरा. ब्रेस्टवर बर्फाचे खडे वापरण्यासाठी एका रुमालात बर्फाचे काही खडे घ्या. त्यानंतर प्रभावित भावावर त्याचा शेक द्या. याने सूज कमी होण्यास मदत होईल. 

हळदीचा वापर (Use of Turmeric) 

हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल (Anti Bacteria ) आणि अँटी व्हायरल (Anti Viral ) गुणधर्म असतात. हळदीच्या वापरामुळे ब्रेस्टच्या आसपास झालेलं इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते. एक चमचा गुलाब पाण्यात हळद पावडर टाकून घट्ट पेस्ट तयार करा. याला इन्फेक्शन झालेल्या जागेवर लावा. याने ब्रेस्ट इन्फेक्शन दूर होण्यास मदत होईल. 

ऍलोव्हेरा (Aloe vera)

ऍलोव्हेराने त्वचेला पोषण मिळतं. ऍलोव्हेरामध्ये अँटी इन्फ्लमेटरी ( Anti  Inflamation) गुण असतात. ऍलोव्हेराचा ब्रेस्ट इन्फेक्शन झालेल्या जागेवर वापर केल्याने तुम्हाला मदत मिळू शकते. इन्फेक्शन झालेल्या जागेवर ऍलोव्हेरा लावल्याने आलेली सूज, आलेली लाल पुरळं किंवा येणारी खाज कमी होते.    

नारळाचं तेल वापरणं (Coconut Oil)

नारळाच्या तेलात अनेक पोषक तत्वे असतात. स्किनवर नारळाचं तेल वापरल्याने त्वचेला तेलातील पोषक तत्व मिळतात. नारळाच्या तेलाचा ब्रेस्ट इन्फेक्शनसाठी वापर करायचा झाल्यास हातावर एक चमचा नारळाचं तेल घ्या. ते इन्फेक्शन झालेल्या जागेवर ते लावा. याने इन्फेक्शन कमी होण्यास मदत होईल. 

ऍपल व्हिनेगर (Apple Cider Vinegar)

ऍपल साइडर व्हिनेगर मध्ये अँटी मायक्रोबियल गुण असतात. याने इन्फेक्शन दूर करण्यास मदत होते. ब्रेस्ट इन्फेक्शन दूर करण्यासाठी एक कप पाण्यात दोन चमचे ऍपल साइडर व्हिनेगर मिक्स करा. या मिश्रणाला प्रभावित जागेवर लावा. याने ब्रेस्ट इन्फेक्शन कमी होण्यास मदत होईल. 

ब्रेस्ट इन्फेक्शनला बाय बाय करण्यासाठी या घरगुती पद्धतींचा वापर केला जाऊ शकतो. मात्र लक्षात ठेवा, ब्रेस्टवरील कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन चांगलं नसतं. याकडे दुर्लक्ष झालं तर याचे गंभीर परिणाम महिलांना भोगावे लागू शकतात. यासाठी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. 

( विशेष नोंद - वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. वरील माहिती सर्वसामान्य आयुष्यात वापरायची झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या )

breast infection and best home remedies to cure women problem