मुंबई : आपल्या बदलत्या लाइफस्टाइल, चुकीचं खानपान आणि आरोग्यावर लक्ष न देने शरीरासोबत आपल्या मेंदूसाठी देखील धोकादायक आहे. माहितीनुसार १ मिनिटात ३ भारतीय म्हणजेच प्रत्येकी २० सेकंदात १ भारतीय ब्रेन स्ट्रोकचा बळी होत आहे आणि हा आकडा वेगाने वाढत आहे.
दर वर्षी १५ लक्ष भारतीय ब्रेन स्ट्रोकचे शिकार होतात आणि त्यातले ९० टक्के रुग्ण वेळेवर रुग्णालयात नाही पोहचत. ५५ वर्ष वय झाल्यानंतर प्रत्येकी ६ पुरूषांपैकी १ पुरूष आणि प्रत्येकी ५ महिलांपैकी १ महिलेला ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता वाढते.
मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयाचे सिनियर कंसल्टंट न्युरोसर्जन डॉ. अनिल पी कापुर्कर म्हणाले, ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यु देखील होवू शकतो, उपचार झाल्यास सामान्य जीवन जगता येतं अथवा आयुष्यभर दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं.
डॉ कापुर्कर म्हणतात की हार्ट अटॅकच्या लक्षणांसारखी ब्रेन स्ट्रोकची लक्षण नसतात, ते तुमच्या मेंदूच्या कोणत्या भागाला प्रभावित करत आहे, त्यावर लक्षणे अवलंबून आहे.
ब्रेन स्ट्रोक, शरीराच्या कोणत्या भागाच्या हालचाल न होण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे सगळ्यात सोपा आणि गरजेचा उपाय म्हणजे - बॉडी बॅलेंन्स, डोळे, चेहरा, हात, बोलणे यावर त्वरित उपचार करा.
एखाद्या व्यक्तीला स्वत: ला उभे राहता येत नसेल, म्हणजेच स्वत: ला सांभाळता येत नसेल, बोलता-बोलता अचानक आवाज बंद होत असेल, डोळ्यांना अचानक अंधत्व येत असेल, अचानक चक्कर येत असेल, हातातल्या वस्तू अचानक निसटत असतील, तर त्या व्यक्तीने लगेच रुग्णालयात दाखल व्हावे. त्यामुळेच ब्रेन स्ट्रोकचा उपचार करण्याआधी सीटी स्कॅन आणि एमआरआय करणे गरजेचे आहे.