Best Home Remedy For Cholesterol : बदलेल्या जीवनशैलीमुळे शरीरातील नसांमध्ये खराब कोलेस्टेरॉल (LDL Cholesterol) वाढण्याची समस्या अगदी सामान्य झाली आहे. दिवसेंदिवस ही समस्या गंभीर होत आहे. खराब कोलेस्टेरॉल (LDL Cholesterol) वजन वाढीसोबत अनेक गंभीर आजार त्रासदायक ठरतात. हृदयविकार, बीपी यांसारख्या आजार होण्याची भीती निर्माण होते. त्यामुळे तुमच्या शरीरातील ही घाण नसांमधून बाहेर पडण्यासाठी एक जबरदस्त घरगुती उपाय सांगण्यात आलाय.
सामान्यत: उच्च कोलेस्टेरॉलची पातळी वाढू नये म्हणून औषधांसोबत काही घरगुती उपाय करणे फार गरजेचे आहे. आपल्या किचनमधील हे शक्तीशाली धान्य तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरतं. हे धान्य प्रत्येकाच्या घरात असतं. हे भरड धान्य कोलेस्ट्रॉल समस्येवर अतिशय फायदेशीर ठरतं. (Boil and eat this powerful grain wheat every day removes bad or ldl cholesterol in blood vessels)
आम्ही बोलत आहोत, कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी गव्हाचे योग्य सेवन केल्यास हा त्रास दूर होण्यास मदत मिळते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गव्हामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा चांगला स्रोत आढळते. त्यामुळे गव्हाच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते.
त्याशिवाय तज्ज्ञ सांगतात की, तुम्ही गव्हाचं (Boil Wheat) सेवन हे उकडून करता तेव्हा त्यातील फायबर हे वाढतं. शरीरातील खराब चरबीयुक्त लिपिड्स बाहेर पडण्यास मदत मिळते. या गव्हाच्या सेवनामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ होण्यास मदत मिळते आणि उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. तुम्हीही कोलेस्ट्रॉलचे रुग्ण असाल तर तुम्ही याचे सेवन करणे खूप गरजेचे आहे.
जर तुम्हाला कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल, तर तुम्ही दररोज गव्हाचे काही दाण्याचे सेवन करा. या पाण्याचे सेवन केल्यास चयापचय दर वाढवते आणि आतड्याची हालचाल गतिमान होण्यास मदत मिळते. त्याशिवाय पोट साफ होतं. बद्धकोष्ठतासारख्या समस्या दूर होण्यास फायदेशीर आहे. एवढंच नाही तर फॅटी लिव्हरचा धोकाही कमी होतो.
यासाठी गव्हाचे दाणे किंवा भरडा घ्या आणि ते पाण्यात उकळण्यासाठी ठेवा. यात कांदा, मिरची, हिरवे धणे आणि मसाले घाला. आता हे चांगल शिजवल्यानंतर त्याच सेवन करा. शरीराला ऊर्जा पुरवण्यासोबतच अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करण्यात मदत मिळते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)