मुंबई : सोयाबिनच्या पिठाचा वापर करून सोयाचे तुकडे किंवा सोया चंक्स बनवले जातात. हे सोया चंक्स आपल्या शरीरातील चरबी आणि तेल काढून टाकण्यात मदत करते. पाण्यात भिजल्यावर ते एकदम मऊ होतात. यानंतर त्यांना ग्रेव्हीमध्ये ठेवले जातात. तुम्ही सोया चंक्सचे तुम्ही अनेक प्रकार बनवु शकतात. यात भरपूर पोषण आहे. हे शरीरासाठी फायदेशीर आहे. त्याचे आरोग्यासाठी काय काय फायदे आहेत? ते जाणून घेऊया.
हाडांसाठी चांगले - सोया चंक्स मिनरल, कॅल्शियम, तांबे, जस्त, जीवनसत्वे आणि सेलेनियमने समृद्ध असतात. म्हणून, ते हाडांसाठी खूप चांगले आहेत. ते नवीन हाडांच्या वाढीस मदत करतात, हाडे मजबूत बनवतात तसेच हाड बरे होण्याची प्रक्रिया वेगवान करतात.
हृदयाचे आरोग्य सुधारते - उच्च एलडीएल कोलेस्टेरॉल असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका असतो. जसे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका. अशा स्थितीत सोया चंक्स शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात. म्हणून, त्यामुळे चंक्स खाल्याने हृदयाचे रोगांपासून संरक्षण होते.
वजन नियंत्रित करण्यासाठी - हे आपल्याला वजन कमी करण्यासाठी देखील मदत करते. एका अभ्यासानुसार, सोया चंक्स इंद्रियांभोवती अतिरिक्त चरबी जमा होण्यापासून रोखतात. अशा प्रकारे, ते वजन कमी करण्यास मदत करतात. शिवाय, सोया चंक्स प्रथिन्यांनी समृद्ध असतात, जे दुबळे स्नायूंच्या विकासासाठी फायदेशीर असतात. या व्यतिरिक्त, ते चयापचय गतिमान करते. हे वजन नियंत्रित करण्यास देखील मदत करते.
पचनास मदत करते - सोया चंक्स फायबरमध्ये समृद्ध असतात आणि फायबर पाचन तंत्रात महत्वाची भूमिका बजावते. यामुळे तुम्हाला बऱ्याच काळासाठी पोट भरल्यासारखे वाटते. हे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास सक्षम आहे. याव्यतिरिक्त, सोयामध्ये ऑलिगोसेकेराइड नावाचे कार्बोहायड्रेट असते जे निरोगी आतड्यांच्या जीवाणूंच्या वाढीस उत्तेजन देते.
त्वचा आणि केसांसाठी चांगले - अनेक आरोग्य फायद्यांव्यतिरिक्त, हे अनेक सौंदर्य फायदे देखील प्रदान करते. सोया चंक्स वापरणे तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण ते त्वचेला हलकी करते, त्वचा मजबूत आणि सुंदर करते, सुरकुत्या कमी करते. कोरड्या केसांची समस्या देखील कमी करते, केस मजबूत बनवते. यामुळे केस गळणे कमी होते. म्हणून, सौंदर्याच्या फायद्यांसाठी तुम्ही ते तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता.