मुंबई : मित्र हे आयुष्याचा अभिवाज्य भाग असतात. काही लोकांना तर मित्रांशिवाय अजिबात करमत नाही. काही लोकांचे मित्र पटकन बनतात तर काही लोकांना मैत्री करण्यास खूप वेळ लागतो. काहींचे फ्रेंड सर्कल खूप मोठे असते तर काहींना मोजकेच फ्रेंड्स असतात. तुम्ही यापैकी कशात मोडता?
ज्यांना अधिक फ्रेंड्स असतात त्यांचे सोशल सर्कलही वाढते. त्यामुळे त्यांच्यावर वयाचा परिणाम खूप कमी आणि उशिरा होतो. एका संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, भावना, प्रेरणा यांची जाणीव असणाऱ्या मेंदूवर वयाचा प्रभाव पडतो. पण ज्यांचे खूप फ्रेंड्स आहेत, त्यांच्या सोबत असे होत नाही.
अमेरिकेतील कोलंबसच्या स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ ओहियोमध्ये न्यूरोलॉजिकल इंस्टीट्यूटमध्ये यावर अभ्यास करण्यात आला आहे. त्यातून असे दिसून आले की, सामाजिकरीत्या सक्रिय असलेल्या व्यक्तीच्या मेंदूवर वयाचा प्रभाव खूप उशिरा होतो.
जर्नल फ्रेंटियर इन एजिंग न्यूरोसायन्स मध्ये प्रकाशित संशोधनाअंतर्गत १५-१८ उंदरांवर प्रयोग करण्यात आला. उंदारांचे दोन गट बनवून त्यांच्यावर तीन महिने अभ्यास करण्यात आला. यात उंदरांची स्मरणशक्ती एका खेळण्याच्या माध्यमातून तपासण्यात आली. संपूर्ण प्रयोगाअंती असे दिसून आले की, समूहात राहणाऱ्या उंदरांची स्मरण क्षमता अधिक चांगली होती. असे माणसांसोबतही होते, असे स्वास्थ्य वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.