कोबी खाल तर, आरोग्यदायी जीवन मिळवाल!

जाणून घेऊया अशा कोबीचे आरोग्यदाई फायदे..

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 6, 2018, 10:16 PM IST
कोबी खाल तर, आरोग्यदायी जीवन मिळवाल! title=

मुंबई : आजकालच्या फास्टफूडच्या जमान्यात कोबी माहित नसलेला व्यक्ती तसा विरळाच. कोणत्याही चायनिज सेंटरमध्ये गेले की, कोबीशिवाय पान नाही हालत. घराघरांमध्यल्या किचनमध्येही कोबीच राजा असतो. स्पेशल मेनू असो किंवा साधी भाजी कोबी हजर असतोत. तर मंडळी जाणून घेऊया अशा कोबीचे आरोग्यदाई फायदे..

  • नियमीतपणे कोबीचा वापर अहारात केला तर, पोट साफ राहते. बद्धकोश, पोटफूगी, पोटदुखी, गॅस असे प्रकार कमी होतात. जेवताना सॅलड म्हणूनही कोबीचा वापर केला जातो.
  • कोबीचे सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील पचनक्रीया सुरूळीत पार पडते. अर्थातच मेटाबॉलिझमला नियमित करण्यात कोबी महत्त्वाची भूमिका बजावतो.
  • ताज्या कोबीचे बारीक तुकडे करून त्यात आवश्यकतेनुसार मीठ, काळी मिर्ची आणि लिंबाचा रस टाकून दररोज सकाळी नियमीत सेवन केल्याने बद्धकोशाची समस्या कमी होते. 2-4 आठवडे हा प्रयोग करून पाहण्यास हरकत नाही.
  • व्हिटॅमिन यू हे एक दुर्मिळ व्हिटॅमीन असून, ते तुम्हाला ताज्या कोबीच्या रसात मुबलक प्रमाणात मिळू शकते. हे व्हिटॅमिन अल्सर प्रतिरोधक म्हणूनही गुणकारी मानले जाते.
  • महत्त्वाचा सल्ला: एखाद्या व्यक्तीस एखाद्या पदार्थाची एलर्जी किंवा इतर त्रास असू शकतो. त्यामुळे हे वाचून प्रयोग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.