मुंबई : मे महिना आणि आंबा असं समीकरणचं आहे. सध्या आंब्याचा सीजन आहे. बाजारात विविध प्रकारचे आंबे आले आहेत. अनेक जण आंबा म्हटलं की अगदी ताव मारतात. पण आंबाचे जितके फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत. त्यामुळे आंबा खाताना जरा नियंत्रणात खाणंच फायद्याचं ठरेल.
आंबा खाण्याच्या अनेक फायद्यांपैकी एक फायदा म्हणजे आंबा त्वचेला आतून साफ करतो. आंब्यात भरपूर प्रमाणात बीटा-कॅरोटीन आणि विटॅमिन ए असतं. आंब्यात असणारे कॅरोटीनॉइड त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करते.
आंब्यात विटॅमिन सी, ए आणि विविध प्रकारचं कॅरोटेनॉइड असतात. तसेच जिंक मोठ्या प्रमाणात असंत. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
आंबा विटॅमिन आणि खनिजांचा चांगला स्त्रोत असल्याने शरीराला हायड्रेटेट ठेवतो. एका अभ्यासात शरीराचा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आंबा फायदेशीर ठरतो.
अॅनीमियाच्या रुग्णांसाठी आंबा नैसर्गिक वरदान आहे. आंब्यात असणारं लोह शरीरासाठी फायदेशीर आहे. आर्यन आणि कॅल्शियम वाढवण्यासाठी आंबा अतिशय गुणकारी आहे.
आंब्याला लवकर पिकवण्यासाठी त्यात अनेकदा कॅल्शियम कार्बाइटचा मारा केला जातो. या केमिकलमुळे शरीराला मोठा धोका असतो. आंबा खाण्याआधी तो धुवून स्वच्छ केला जातो पण केवळ पाण्याने धुण्यामुळे त्यावरील केमिकल पूर्णत: नष्ट होत नाही.
एका मध्यम आकाराच्या आंब्यात १३५ कॅलरीज असतात. अधिक प्रमाणात आंबा खाल्याने वजन वाढते.
आंब्याच्या देठाजवळ असणारा द्रव पदार्थ खाण्याआधी साफ करा. तो तसाच खाल्याने घशाला त्रास होऊ शकतो. घसा दुखू लागतो किंवा सूजही येऊ शकते.
आंबा गरम फळ आहे. त्यामुळे त्याच्या अधिक सेवनाने चेहऱ्यावर किंवा शरीरावरही मुरुम, पुरळ येऊ शकतात.
ज्या लोकांना संधिवात किंवा सायनस आहे अशा लोकांनी आंब्याचं सेवन कमी प्रमाणात करावं. कच्ची कैरी किंवा आंब्याच्या अतिसेवनाने संधिवात आणि सायनसचा आजार वाढू शकतो.
आंब्यात मोठ्या प्रमाणात साखर असते. नैसर्गिक साखर शरीरासाठी, आरोग्यासाठी चांगली असते. पण आंब्याचं अधिक सेवन केल्याने ब्लड शुगरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी आंब्याचं सेवन नियंत्रणात करावं.