Beer Benefits: मद्यपान करणे शरीरासाठी घातक असते असे सांगण्यात येते. यामुळे अनेक जण मद्यपानापासून दूर राहतात. मात्र, बिअर पिणे शरीरासाठी वरदान ठरू शकते असं कुणी तुम्हाला सांगीतल तर? विश्वास नाही बसणार ना. पण बिअर पिणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते असा दावा संशोधकांनी केला आहे. अनेकांचे बियर हे फेव्हरेट ड्रिंक आहे. यामुळे अनेक जण इतर पेयांपेक्षा बियरचे सेवन करतात. बियर हे देखील एक अल्कोहोलिक पेय आहे.
अनेकांना रोज ड्रिंक करण्याची सवय असते. कोणाला वाइन प्यायची सवय तर कोणाला साधा लेमन ज्यूस पिण्याची सवय असते. तर काही लोकांना वाटते की बिअर आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. पण, जर तुम्हाला असे वाटत असेल तर ते चुकीचे असेल. कारण बिअर पिण्याचे अनेक फायदे आहेत, पण आपण रोज किती बिअर प्यायली पाहिजे हे बहुतेकांना माहीत नसते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बिअरमध्ये अल्कोहोलचे (alcohol) प्रमाण देखील कमी आहे आणि ते इतर मादक पेयांपेक्षा कमी हानिकारक मानले जाते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे बिअर प्यायल्याने अनेक गंभीर आजारांचा धोकाही दूर होतो.
वाचा: रिकाम्या पोटी केळीचे सेवन करावे की नाही? जाणून घ्या त्या मागचे फायदे आणि तोटे
(Note- वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. तुम्हाला आरोग्यासंबंधी काही गंभीर समस्या असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे.)