मुंबई : दिवसाची सुरुवात व्हायची खोटी की मला चहाचा घोट लागतो, असं म्हणणारे कैकजण आपण पाहिले असतील. माझा दिवस चहाशिवाय सुरुच होत नाही, असं म्हणणारे तुम्हीही असाल. पण, ही सवय किंवा हे व्यसनच म्हणा कितपत फायद्याचं आहे याचा कधी विचार तुम्ही केला आहे का?
आयुर्वेदातील संदर्भांचा अभ्यास पाहिला असता रिकाम्यापोटी चहा पिणं (Bed Tea) पाचक रस तयार करण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणणारं ठरु शकतं. सतत वाटणारी भीतीही यामुळं बळावते.
दीर्घकाळापासून जर तुम्हाला उपाशीपोटी चहा पिण्याची सवय असेल तर त्यामुळे अल्सरसारखे आजार बळावू शकतात.
रिकाम्यापोटी चहा पिणं किंवा दिवसाची सुरुवात चहानं करणं वातविकारांना आमंत्रण देणारं ठरतं. या सवयीमुळं हाडं कमकुवत होतात ज्यामुळं आयुर्मानही कमी होत जातं.
चहामध्ये असणारं कॅफिन तत्त्वं चिडचीड, राग आणि नैराश्यात भर टाकतं. सकाळच्या वेळी दिवसाची सुरुवाच चहानं केल्यास रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांना नको ते त्रास जडतात. त्यामुळं तुम्हाला अशी एखादी सवय असल्यास आताच त्यापासून स्वत:ला दूर करा....
(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)